कधी विचार केलाय चालता-चालता बुटाची लेस का सुटते? 

By ऑनलाइन लोकमत | Published: March 15, 2019 04:15 PM2019-03-15T16:15:12+5:302019-03-15T16:19:34+5:30

घरातून निघताना आपण सगळेच फार काळजीपूर्वक आणि चांगल्याप्रकारे बुटांची लेस बांधतो. पण अनेकदा चालता चालता भर गर्दीत बुटाची लेस निघते.

Why do shoe laces become untied on their own | कधी विचार केलाय चालता-चालता बुटाची लेस का सुटते? 

कधी विचार केलाय चालता-चालता बुटाची लेस का सुटते? 

Next

(Image Credit : Seeker)

घरातून निघताना आपण सगळेच फार काळजीपूर्वक आणि चांगल्याप्रकारे बुटांची लेस बांधतो. पण अनेकदा चालता चालता भर गर्दीत बुटाची लेस निघते. या गोष्टीने अनेकदा हैराण होतो माणूस...पण कधी विचार केलाय का की, असं का होतं? का चालता चालता बुटाची लेस अशाप्रकारे निघते?

१७ पानांचा रिपोर्ट

बुटाची लेस सहजपणे बांधणे हे आपणा सर्वांनी बालपणीच शिकलेले असतो. तेव्हापासून अनेकवर्ष आपण तेच करतो. मात्र फार काळजीपूर्वक लेस बांधून सुटण्यामागेही विज्ञान आहे. कॅलिफोर्निया यूनिव्हर्सिटीमध्ये यावर १७ पानांचा एक रिसर्च रिपोर्टही आहे. 

(Image Credit : Earth.com)

'या' कारणामुळे सुटते लेस

क्रिस्टॉफर डेली-डायमंड, क्रिस्टीन ग्रेग आणि ऑलिव्हर ओरॅली या तीन वैज्ञानिकांनी बुटाची लेस सुटण्याचं किंवा सैल होण्याच्या कारणाचा शोध लावला आहे. रिसर्च रिपोर्टनुसार, लेसला एकदा चांगल्याप्रकारे गाठ बांधल्यावर त्या बराच वेळ तशाच घट्ट राहतात. पण जसेही त्यांना सैल करणारी एखादी शारीरिक हालचाल होते, तेव्हा त्यांची गाठ सुटते. 

७ टक्के वाढते गुरूत्व शक्ती

रिपोर्टनुसार, धावताना किंवा वेगाने चालताना आपला पाय जमिनीपैक्षा सात पटीने जास्त गुरूत्व बलाच्या संपर्कात येतो. क्रिया आणि प्रतिक्रियेच्या नियमानुसार जमिनीतूनही तितकीच शक्ती परत पाठवली जाते. पायांच्या मांसपेशी हे सहन करतात, पण बुटाच्या लेसच्या गाठी याने सैल होऊ लागतात. जमिनीवर पाय पडताच गाठीवर जोर पडतो आणि पाय हवेत परत आल्यावर गाठ सैल होते. धावताना आणि चालताना पुन्हा पुन्हा असं होतं. त्यामुळे लेस सुटते.

सध्या क्रॉस लेसही येऊ लागल्या आहेत. या डीएनएच्या संरचनेसारखे बांधल्या जातात. याप्रकारच्या लेसही कायनेटिक एनर्जी म्हणजे गतिज ऊर्जेसमोर हार मानतात. मजबूतीने लेस बांधणे हे सैनिकांच्या बुटामध्ये सोपं असतं. या बुटांना छोट्या हूकचा आधार दिला जातो. त्यामुळे लेसच्या गाठी सुटत नाहीत. 

Web Title: Why do shoe laces become untied on their own

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.