'व्हॉट्सअॅप गोल्ड ' एक स्पॅम

By Admin | Published: May 27, 2016 07:52 AM2016-05-27T07:52:03+5:302016-05-27T09:03:49+5:30

जेव्हा एखाद्या कंपनीचे उत्पादन बाजारात फार मोठ्या प्रमाणात विकले जाते वा लोकप्रिय होते तेव्हा काही समाजकंटक त्याचे डुप्लिकेट बाजारात आणून लोकांची फसवणूक करण्याचा प्रयत्न करतात

'Whatsapp Gold' is a Spam | 'व्हॉट्सअॅप गोल्ड ' एक स्पॅम

'व्हॉट्सअॅप गोल्ड ' एक स्पॅम

googlenewsNext
>अनिल भापकर 
 
जेव्हा एखाद्या कंपनीचे उत्पादन बाजारात फार मोठ्या प्रमाणात विकल्या जाते किंवा लोकप्रिय होते तेव्हा काही समाजकंटक त्या उत्पादनाचे डुप्लिकेट लगेच बाजारात आणून लोकांची फसवणूक करून डुप्लिकेट उत्पादन विकण्याचा प्रयत्न करतात . असाच काहीसा अनुभव सध्या व्हॉट्सअॅप कंपनी आणि व्हॉट्सअॅप युझर्सला येत आहे. कारण मागील काही दिवसांपासून व्हॉट्सअॅप युझर्सना एक मेसेज येत आहे कि तुमचे व्हॉट्सअॅप अपग्रेड करून व्हॉट्सअॅप गोल्ड इन्स्टॉल करून घ्या. व्हॉट्सअॅप गोल्ड हे पूर्वी फ़क़्त सेलिब्रिटीसाठी उपलब्ध करण्यात आलेले होते आता ते  तुम्हाला  उपलब्ध करून देण्यात आलेले आहे. या नवीन व्हॉट्सअॅप गोल्ड मध्ये तुम्ही  व्हिडिओ कॉलिंग ,फ्री कॉलिंग ,एकाच वेळी १०० हून अधिक इमेजेस अॅटॅच करण्याची सुविधा आहे, अशा अनेक भूलथापांना युझर्स बळी पडत असन ते दिलेल्या लिंक वरून नवीन व्हॉट्सअॅप गोल्ड साठीच्या लिंक वर क्लिक करतात .यासोबतच तुमच्या मोबाइल वर एक हिडन प्रोग्राम इन्स्टाल होतो जो तुमचा सर्व डेटा, तुमची वैयक्तिक माहिती चोरी करतोय. 
यापूर्वीही एकदा व्हॉट्सअॅप प्लस नावाने युझर्सची  फसवणूक झालेली होती . तेव्हा व्हॉट्सअॅपनेच  सर्च करून व्हॉट्सअॅप प्लस असलेल्या मोबाइलची सेवा २४ तासांसाठी खंडीत केली होती. आताही काही लोकाना व्हॉट्सअॅप गोल्ड व्हर्जन च्या  नावाखाली फसवण्याचे प्रकार सुरु झाले आहॆत. तेव्हा आपण काळजी  घेतलेली बरी .

Web Title: 'Whatsapp Gold' is a Spam

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.