हॉटेलमध्ये एकदा अर्धवट वापरलेल्या साबणांचं नंतर काय होतं?

By ऑनलाइन लोकमत | Published: November 29, 2018 03:10 PM2018-11-29T15:10:04+5:302018-11-29T15:11:12+5:30

जगातल्या मोठ-मोठ्या हॉटेल्समध्ये लोकांना वापरण्यासाठी नवीन साबण, शॅम्पू, मॉइश्चरायजर, टूथपेस्ट आणि अशा अनेक वस्तू दिल्या जातात.

What happens to your leftover half used hotel soap and toiletries | हॉटेलमध्ये एकदा अर्धवट वापरलेल्या साबणांचं नंतर काय होतं?

हॉटेलमध्ये एकदा अर्धवट वापरलेल्या साबणांचं नंतर काय होतं?

googlenewsNext

जगातल्या मोठ-मोठ्या हॉटेल्समध्ये लोकांना वापरण्यासाठी नवीन साबण, शॅम्पू, मॉइश्चरायजर, टूथपेस्ट आणि अशा अनेक वस्तू दिल्या जातात. या मोठ्या हॉटेल्समधील शॅम्पू आणि साबण दररोज बदलले जातात. पण कधी विचार केलाय का की, हॉटेलमध्ये जे साबण, शॅम्पू वापरले जातात किंवा अर्धे वापरले जातात त्यांचं काय होतं? 

सामान्यपणे याचं उत्तर हे साबण किंवा शॅम्पू फेकले जात असतील असं मिळू शकतं. तसेच ज्या वस्तू वापरल्याच नाहीयेत त्या दुसऱ्या ग्राहकांना दिल्या जात असतील. ऐकायला हे खरंही वाटतं. पण हे खरं नाहीये.

आधी कचऱ्यात फेकत होते

हे तर नक्की आहे की, लाखोंच्या संख्येने असलेल्या हॉटेल्सच्या रुम्समधून रोज अशा वस्तू निघत असतील. ९ वर्षांआधी पर्यंत जास्तीत जास्त हॉटेलवाले या वस्तू कचऱ्यात फेकत होते. म्हणजे दिवसाला हजारो टन कचरा पर्यावरणाचं नुकसान करत होता. यादरम्यान वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशनचा एका रिपोर्ट आला. यात सांगण्यात आलं की, हॉटेलच्या रुम्समधून साबण, शम्पू आणि असेच दररोज वाया जाणारे प्रॉडक्टमुळे एकीकडे कचऱ्यांचा ढिग वाढतोय. तर याचा गरीबांच्या स्वच्छतेची समस्या दूर केली जाऊ शकते.

दररोज दोन लाखांपेक्षा अधिक साबण-शॅम्पू

२००९ मध्ये काही संस्थांनी एकत्र येऊन एक मोहिम चालवली होती. एका रिपोर्टनुसार, भारतात दररोज लाखोंच्या संख्येने अशा वस्तू हॉटेलबाहेर निघतात. देशात १ ते १.५ लाख हॉटेल रुम आहेत. यावरुन कल्पना करु शकता की, दररोज किती वस्तू बाहेर पडत असतील. 

आता रिसायकलिंग केलं जातं

या समस्येचं समाधान करण्यासाठी जगभरात 'क्लीन द वर्ल्ड' आणि अशाच काही संस्थांनी मिळून 'ग्लोबल सोप प्रोजेक्ट' नावाचा उपक्रम राबवला. या अंतर्गत अर्धे वापरले गेलेले साबण नवीन साबण तयार करण्यासाठी वापरले जातात. हेच कंडिशनर, शॅम्पू आणि मॉइश्चरायजरसोबत केलं जातं. हे रिसायकल केलेले प्रोडक्ट विकसनशील देशांमध्ये पाठवले जातात.

गरीबांना स्वच्छतेसाठी प्रोत्साहन

या उपक्रमाचा अभाव त्या क्षेत्रांमध्ये मिळतो, जिथे स्वच्छ पाणी, स्वच्छता आणि सॅनिटेशनच्या सुविधांचा अभाव आहे. गरीब देशांमध्ये अस्वच्छतेमुळे अनेक लोक निमोनिया आणि डायरिया या आजाराचे शिकार होत आहेत. रिसायकल केलेले साबण-शॅम्पूने लोकांना स्वच्छतेसाठी प्रोत्साहन मिळतं. 

आधी शुद्ध केलं जातं

या उपक्रमाला आता जगभरातील सर्वच देशांमध्ये पाठिंबा मिळत आहे. स्थानिय स्तरावरही अनेक संस्था काम करतात. जे हॉटेलमधील अशा वस्तू एकत्र करतात आणि ते रिसायकल करण्यासाठी पाठवले जातात. रिसायकल दरम्यान साबण, शॅम्पू, किंडश्नर या वस्तू किटाणूरहीत केलं जातं. आणि यांच्या शुद्धतेची चाचणीही केली जाते.
 

Web Title: What happens to your leftover half used hotel soap and toiletries

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.