'या' कंपन्यांनी कर्मचाऱ्यांना दिली अजब बक्षिसे!

By ऑनलाइन लोकमत | Published: January 14, 2019 04:21 PM2019-01-14T16:21:15+5:302019-01-14T16:21:46+5:30

आपण नेहमीच वाचत असतो की, वेगवेगळ्या कंपन्यांनी त्यांच्या कर्मचाऱ्या अमकं गिफ्ट दिलं, तमकं गिफ्ट दिलं. यातील बरेचसे गिफ्ट हे असामान्य होते.

Weird and unusual rewards given by companies to its staff | 'या' कंपन्यांनी कर्मचाऱ्यांना दिली अजब बक्षिसे!

'या' कंपन्यांनी कर्मचाऱ्यांना दिली अजब बक्षिसे!

googlenewsNext

(Image Credit : inc.com)

आपण नेहमीच वाचत असतो की, वेगवेगळ्या कंपन्यांनी त्यांच्या कर्मचाऱ्या अमकं गिफ्ट दिलं, तमकं गिफ्ट दिलं. यातील बरेचसे गिफ्ट हे असामान्य होते. कुणी कर्माचाऱ्याला कार दिली तर कुणी प्लॅट्स दिले. एका कंपनीने तर चक्क एका पॉर्नस्टारसोबत रात्री घालवण्याची ऑफर कर्माचाऱ्याला दिली होती. चला जाणून घेऊ कंपन्यांकडून दिले गेलेले असेच काही असामान्य गिफ्ट....

बोनस म्हणून २ कोटी

तुर्की येथील नवजात आयदीनने केवळ ३ कर्मचाऱ्यांसोबत एका स्टार्टअपची सुरुवात केली होती. लवकरच त्यांना फायदा झाला आणि ही येमेकसेपेती कंपनी फूड डिलिव्हरीत नावाला आली. १५ वर्षांनी ही कंपनी त्याने ५८९ मिलियन डॉलरला(४ हजार कोटी रुपये) विकली. त्यातील २५० कोटी रुपये त्याने ११४ इमानदार कर्मचाऱ्यांना बोनस म्हणून दिले.  

बक्षिस म्हणून शेयर

​इटलीतील चश्मा तयार करणारी कंपनी लक्सोटिका. या कंपनीचा बॉस लियोनार्दो डेल वेकहियोने जेव्हा ८० वा वाढदिवस साजरा केला, तेव्हा त्याने कंपनीच्या कर्मचाऱ्यांमध्ये त्याचे १, ४०, ००० शेयर वाटले. साधारण ८ हजार कर्मचाऱ्यांना १० मिलियन डॉलर म्हणजेच आताच्या हिशोबाने ७०-७० कोटी रुपयांचे शेयर मिळाले. लियोनार्दो हा एक अनाथ होता, ज्याने एका फॅक्टरीमध्ये मजुरीने कामाला सुरुवात केली होती. 

मृत्यूनंतर पार्टनरला १० वर्षांपर्यत पगार

गुगल आपल्या कर्मचाऱ्यांना डेथ बेनेफिट्स देत. जर एखाद्या कर्मचाऱ्याचा मृत्यू झाला तर त्या व्यक्तीच्या पार्टनरला १० वर्षांपर्यंत कर्मचाऱ्याच्या पगारातील ५० टक्के पगार दिला जातो. 

पॉर्न स्टार सोबत एक रात्र

चीनची Qihoo 360 टेक कंपनी कर्मचाऱ्यांना बोनस देण्यावरुन चर्चेत होती. २०१५ मध्ये कंपनीने चीनच्या नववर्षाच्या निमित्ताने यशस्वी कर्मचाऱ्यांना जपानमधील प्रसिद्ध पॉर्न स्टार जुलिया क्योकासोबत एक रात्र घालवण्याचा बोनस देण्याची घोषणा केली होती. यावरुन या कंपनीवर चांगलीच टीका झाली होती. नंतर कंपनीने ही घोषणा रद्द केली होती. 

Web Title: Weird and unusual rewards given by companies to its staff

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.