Watch video - accident with truck boy is all safe | पाहा व्हिडीयो - अंगावरून भलामोठा ट्रक गेला तरीही चिमुकला राहिला सुखरुप
पाहा व्हिडीयो - अंगावरून भलामोठा ट्रक गेला तरीही चिमुकला राहिला सुखरुप

ठळक मुद्देहा सगळा प्रकार सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाला आहे.या सीसीटीव्ही कॅमेऱ्याच्या फुटेजमध्ये तो मुलगा नक्की कसा पडला हे दिसत नाहीएदैव बलवत्तर म्हणूनच त्याचे प्राण वाचले अशा प्रतिक्रिया हा व्हिडिओ सोशल मीडियावर नेटीझन्सने दिल्या आहेत.

चांगशू : अपघातांचे अनेक प्रकार आपण कायम पाहत असतो. अपघातग्रस्तांचा दिवस चांगला असेल तर अपघात झाल्यावरही त्यांना साधं खरचटत देखील नाही. नॉर्थेस्ट चीनच्या चांगशू शहरात असाच एक अपघात घडला आहे. चांगशूच्या एका रस्त्यावर सिग्नलवर उभ्या असलेल्या एका रिक्षातून मागून एक ५ वर्षांचा मुलगा खाली पडला. तेवढ्यात सिग्नल संपला आणि गाड्या सुरू झाल्या. या रिक्षाच्या मागे काहीच अंतरावर एक भलामोठा ट्रक उभा होता. मुलगा खाली पडल्याचं त्याच्या पालकांच्या लक्षात आल्यावर त्यांच्या पायाखालची जमिनच सरकली. कारण तो मुलगा पडून सिग्नल चालू झाल्या झाल्या मागून एक मोठा ट्रकही होता. मुलगा खाली पडल्याची त्या ट्रक चालकाला काहीच कल्पना नव्हती. त्यामुळे ट्रक चालकाने साहजिकच सिग्नल सुटल्यावर गाडी चालवालयला सुरुवात केली.

रिक्षा चालकालाही मुलगा खाली पडल्याचं माहित नव्हतं. त्यामुळे सिग्नल सुरू होताच रिक्षाही थोडं अंतर पुढे गेली. पण रिक्षाचालकाच्या हा प्रकार लक्षात येताच त्याने रिक्षा चटकन थांबवली पण ट्रक पुढे निघून गेला होता. म्हणजेच त्या मुलाच्या अंगावरून ट्रक गेला होता. आता मुलाची काय अवस्था झाली असेल, त्याला किती लागलं असेल या विवंचनेत त्याचे आईवडिल असताना तो पडलेला मुलगा अंगावरून ट्रक  गेला तरीही आपल्या दोन पायांवर उभा राहून चालू लागला. खरंतर हा चमत्कार पाहून सगळेच अचंबित झाले कारण भलामोठा ट्रक अंगावरून गेला तरीही या मुलाला साधं खरचटण्याव्यतिरिक्त काहीच झालं नाही. 

हा सगळा प्रकार सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाला आहे. या सीसीटीव्ही कॅमेऱ्याच्या फुटेजमध्ये तो मुलगा नक्की कसा पडला हे दिसत नाहीए. मात्र ट्रक अंगावरून गेला तरीही तो अगदी व्यवस्थित आपल्या स्वत:च्या पायांवर उभा राहून चालू लागला. तिकडच्या स्थानिक माध्यमांनी दिलेल्या वृत्तानुसार या चिमुकल्याच्या खांद्याला थोडीशी दुखापत झाली आहे. बाकी तो अगदी व्यवस्थित आहे. दैव बलवत्तर म्हणूनच त्याचे प्राण वाचले अशा प्रतिक्रिया हा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर नेटीझन्सने दिल्या आहेत.

सौजन्य - www.india.com

आणखी वाचा - पोलिसांनी ८ वर्ष लपवली बेपत्ता तरुणीच्या मृत्युची माहिती


Web Title: Watch video - accident with truck boy is all safe
Get Latest Marathi News & Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and local news from all cities of Maharashtra.