VIDEO- दोन न्यूज अँकर्समध्ये लाईव्ह जुंपली, सोशल मीडियावर व्हिडीओ व्हायरल

By ऑनलाइन लोकमत on Tue, February 27, 2018 9:32am

कार्यक्रमादरम्यान दोन अँकर्समध्ये जुंपणं क्वचितत पाहायला मिळतं.

लाहोर- वृत्तवाहिनीवर बातमी देत असताना किंवा एखाद्या मोठ्या घटनेवर राजकीय किंवा सामाजिक क्षेत्रातील व्यक्तीची प्रतिक्रिया घेताना किंवा चर्चासत्र सुरू असताना न्यूज अँकर व प्रतिक्रिया देणाऱ्या व्यक्तीमध्ये लाईव्ह कार्यक्रमात जुंपल्याचं आपण अनेकदा पाहतो. तसे व्हिडीओही सोशल मीडियावर व्हायरल होतात. पण कार्यक्रमादरम्यान दोन अँकर्समध्ये जुंपणं क्वचितत पाहायला मिळतं. असाच एक प्रकार पाकिस्तानात घडला आहे. एका वृत्तवाहिनीमध्ये लाईव्ह कार्यक्रमादरम्यान दोन अँकर्समध्ये लाईव्ह जुंपली. शोमधील ब्रेकमध्ये हे दोघे अँकर शुल्लक कारणावरून भांडताना दिसत आहेत. 

लाहोरमधील सीटी42 या वृत्तवाहिनीत घडलेला हा प्रकार असून या दोघांमधील शाब्दिक वादाचं फुटेज लिक झालं आहे. शोमध्ये असलेल्या दोन अँकर्सपैकी एक अँकर दुसऱ्या अँकरच्या वागणुकीबद्दल प्रोडक्शन टीमकडे तक्रार करताना दिसतो आहे. 'मी हिच्याबरोबर बुलेटिन कसं करू? असं पहिल्यांदा अँकर बोलतो आहे. तर दुसरीकडे, माझ्याशी बोलू नको, मी तुझ्या टोनबद्दल बोलत होते, असं उत्तर ती महिला अँकर देते. माझ्याशी शिस्तीत बोल. मी कधी तुझ्याशी बेशिस्तीने बोललो आहे का? असं उत्तर दुसरा अँकर देताना दिसतो आहे. ही काय बोलते आहे,त्याकडे लक्ष द्या, असं तो अँकर रागात बोलतो. हे सगळं रेकॉर्ड होतं आहे का? कारण हिचे नखरे कधीच संपणारे नाहीत? असंही त्याने म्हंटलं. 

वृत्तवाहिनीतील या दोन अँकर्सची लाईव्ह कार्यक्रमादरम्यान नेमकं का वाजायला सुरू झालं, याचा संदर्भ अजून लागलेला नाही. पण हा व्हिडीओ व्हायरल झाल्यावर सोशल मीडियावर मेम्सचा पाऊस पडला. प्रत्येक जण ऑफिसमधील सहकाऱ्याबरोबर असंच भांडत, असं प्रत्येकाला वाटू लागलं.   न्यूज अँकर्सचे ऑफ कॅमेरा व्हिडीओ व्हायरल होण्याची ही पहिलीच वेळ नाही, याआधीही असे प्रकार घडले आहेत.   

संबंधित

अश्लीलता आणि सौंदर्य बघणाऱ्याच्या नजरेत - हायकोर्ट   
सनी लिओनीच्या 'बनियान डान्स'चा सोशल मीडियात धुमाकूळ
राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते नबाब मलिक यांच्याविरूद्ध गुन्हा
पुण्यात पावसाला दमदार सुरुवात
अतिरेक्यांना पैसा पुरविणाऱ्या रमेश शहाला पुण्यातून अटक

जरा हटके कडून आणखी

पहिल्याच डेटला तरुणीची फसवणूक, हॉटेलचं बिल न देताच पार्टनर फरार!
'हॅलो फ्रॅण्ड्स चाय पिलो' बोलणाऱ्या भाभीचा सोशल मीडियावर धुमाकूळ, जाणून घ्या ती महिला आहे तरी कोण?
ऑफिसमधील अखेरच्या दिवशी त्यानं आणला घोडा
जगातल्या या देशांकडे नाही आर्मी, दुसऱ्या देशांवर सुरक्षेची जबाबदारी!
'या' व्यक्तीला उन्हाळ्यात वाजते थंडी अन् थंडीत दरदरुन फुटतो घाम

आणखी वाचा