VIDEO : बँकेच्या मिटिंगमध्ये सापाची एन्ट्री, अधिकाऱ्यांची धावपळ

By ऑनलाइन लोकमत | Published: October 15, 2018 09:57 AM2018-10-15T09:57:28+5:302018-10-15T09:57:51+5:30

चीनमधील एका बँकेत काही अधिकारी एका मिटिंग हॉलमध्ये चर्चा करत असतात, त्यावेळी अचानक छतावरुन त्यांच्यासमोवर चक्क भलामोठा अजगर खाली पडला आणि अधिकाऱ्यांची धावपळ सुरु झाली.

VIDEO : Python falls through ceiling at a Chinese bank during meeting | VIDEO : बँकेच्या मिटिंगमध्ये सापाची एन्ट्री, अधिकाऱ्यांची धावपळ

VIDEO : बँकेच्या मिटिंगमध्ये सापाची एन्ट्री, अधिकाऱ्यांची धावपळ

Next

मुंबई : साप हे नाव जरी ऐकले तरी भल्याभल्यांची भंबेरी उडते. अशातच एखाद्या ऑफिसमधील मिटिंगमध्ये अचानक साप आल्यानंतर उपस्थितांचे काय झाले असेल? ...चीनमधील एका बँकेत काही अधिकारी एका मिटिंग हॉलमध्ये चर्चा करत असतात, त्यावेळी अचानक छतावरुन त्यांच्यासमोवर चक्क भलामोठा अजगर खाली पडला आणि अधिकाऱ्यांची धावपळ सुरु झाली. या घटनेचा व्हिडीओ समोर आला आहे. हा व्हिडीओ सोशल मीडियात मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. 
या व्हिडीओत काही अधिकारी उभे राहून  चर्चा करत असल्याचे दिसून येत आहे. यावेळी एका महिला अधिकाऱ्याजवळ  अचानक अगजर जातीचा साप छतावरुन खाली पडला. यावेळी अधिकाऱ्यांची धावपळ सुरु झाली. छतावरुन खाली  पडलेला साप बाहेर जाण्यासाठी प्रयत्न करत होता. मात्र, फरशीवरुन सापाला पळ काढत येत नव्हता.


दरम्यान, घटनास्थळी  वन्यजीव अधिकाऱ्यांना बोलविण्यात आले आणि त्या सापाला त्यांच्या ताब्यात देण्यात आले. 

Web Title: VIDEO : Python falls through ceiling at a Chinese bank during meeting

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.