VIDEO- Pakistani journalist covers his own wedding for local channel; interviews wife, parents and in-laws | VIDEO- पाकिस्तानी पत्रकाराने केलं स्वतःच्याच लग्नाचं रिपोर्टिंग, बायको, आई-वडील व सासरच्या मंडळींचा घेतला इंटरव्ह्यू
VIDEO- पाकिस्तानी पत्रकाराने केलं स्वतःच्याच लग्नाचं रिपोर्टिंग, बायको, आई-वडील व सासरच्या मंडळींचा घेतला इंटरव्ह्यू

इस्लामाबाद- प्रत्येक जण आपल्या लग्नासाठी उत्साही असतो. लग्नात काय काय करायचं या सगळ्याचं प्लॅनिग आधीच केलेलं असतं. पाहुणे, कपडे, डेकोरेशन या सगळ्याचं प्लॅनिंग तर असतंच पण त्याचबरोबर काही हटके करण्याचाही विचार असतो. पण तुम्ही कधी नवरदेवाला स्वतःच्या लग्नात रिपोर्टिंग करताना पाहिलं आहे का ? अर्थातच याचं उत्तर कुणीही नाही असंच देईल. पण सगळ्यांनाच आश्चर्याचा धक्का देणारी ही घटना घडली आहे पाकिस्तानमध्ये. पाकिस्तानमधील एका पत्रकाराचा स्वतःच्या लग्नात रिपोर्टिंग करतानाचा व्हिडीओ सोशल मीडियावर सध्या चांगलाच व्हायरल झाला आहे.  एखाद्या लग्नाला गेल्यावर पत्रकार ज्या प्रमाणे मुलाखती घेतात अगदी त्याचप्रमाणे या पत्रकाराने स्वतःच्याच लग्नात रिपोर्टिंग केलं आहे. हनन बुखारी असं त्या पत्रकाराचं नाव असून पाकिस्तानच्या सिटी 41 या चॅनेलचा हा पत्रकार आहे. 

हननने नवरदेवाच्या पेहरावातच रिपोर्टिंग सुरू केलं व चक्क पत्नी, आई-वडील व सासरच्या मंडळींना प्रश्न विचारायला सुरूवात केली. पाकिस्तानच्या एका टीव्ही चॅनेलमध्ये काम करणाऱ्या या पत्रकाराने स्वतःच्याच लग्नात रिपोर्टिंग केलं. आपली ओळख करून देत तो नातेवाईकांची ओळख करून देतो त्यानंतर त्यांची मुलाखतही घेतो. लग्नाबाबत त्यांची प्रतिक्रियाही जाणून घेतो, असा हा व्हिडीओ सध्या व्हायरल झाला आहे. 
 

लग्नाच्या पेहेरावात हातात माईक घेऊन हा पत्रकार संपूर्ण लग्नात फिरला. तिथली व्यवस्था त्याने दाखवली. दोन्ही कुटुंबाशी त्याने चर्चा केली आणि मग त्याने आपला मोर्चा होणाऱ्या पत्नीकडे वळवला. पत्नीलाही त्याने प्रश्न विचारले हा सगळा प्रकार सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.

स्वतःच्याच लग्नात अशा प्रकारे रिपोर्टिंग करणारा नवरदेव पाहून हसू आवरच नाहीये. हनन बुखारी याचा हा व्हिडीओ सध्या सोशल मीडिया, वृत्तवाहिन्यांवर चर्चेचा विषय ठरतो आहे.  


Web Title: VIDEO- Pakistani journalist covers his own wedding for local channel; interviews wife, parents and in-laws
Get Latest Marathi News & Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and local news from all cities of Maharashtra.