ठळक मुद्देही डोमिनो इफेक्टची कलाकृती पाहून सगळेच नेटिझन्स अवाक् झालेतया पत्यांचा वापर करून रेखीव रांगोळीसदृश कलाकृती तयार करण्यात आलीय ही कोणत्याही प्रकारची प्रकाशयोजना नसून डोमिनो इफेक्टच आहे.

चीन : लहानपणी तुम्ही कधी खेळाच्या पत्यांचा वापर करून घर बांधलं आहे का? हवेमुळे ते घर कसं अलगद खाली कोसळत जातंय, हे पाहतानाही आपल्याला किती आनंद व्हायचा. अशीच एक नवी कलाकृती आता जन्माला आलीय. या पत्यांचा वापर करून रेखीव रांगोळीसदृश कलाकृती तयार करण्यात आलीय आणि त्याला डोमिनो इफेक्ट देण्यात आलाय. चीनमधल्या एका अवलिया कलाकाराने ही कलाकृती साकारलेली आहे.

डोमिनो इफेक्टचा वापर करत त्याने बनवलेली नयनरम्य कलाकृती आता सोशल मीडियावरही व्हायरल होतेय. आपल्या कल्पकतेचा वापर करत तरुण मंडळी सतत काही ना काही नवं करू पाहतात. आपल्याकडे असलेल्या साहित्यांचा वापर करून काहीतरी हटके करण्याचा प्रत्येकाचा प्रयत्न असतो. अशीच एक हटके जादू एका चीनमधल्या अवलियाने केला आहे. खेळाच्या पत्यांची आकर्षकपणे मांडणी करून त्याला डोमिनो इफेक्ट दिलाय. हा डोमिनो इफेक्ट पाहून तुमचेही डोळे चक्रावतील.

हा व्हिडिओ चीनमधला असून चीनच्या एका कलाकाराने ही कलाकृती साकारलेली आहे. खूप तासांच्या मेहनतीनंतर ही कलाकृती साकारण्यात आलेली आहे. आता तुम्हाला प्रश्न पडला असेल की डोमिनो इफेक्ट म्हणजे नक्की काय? तर डोमिनो इफेक्ट म्हणजे पत्ते एका पाठोपाठ ठेवून त्यांना मागच्या बाजूने पाडणं. म्हणजे पत्ते मागच्या बाजूने एकावर एक  पडत जाताना पाहताना जे दृष्य दिसतं त्याला डोमिनो इफेक्ट म्हणतात. बरं इथे पत्ते आहेत म्हणून पत्त्यांचा उल्लेख करण्यात आलाय, पण काहीवेळा डोमिनो इफेक्टसाठी विशिष्ट ठोकळ्यांचा वापर केला जातो. 

हा व्हिडिओ पाहताना तुम्हाला वाटेल की येथे प्रकाशयोजना केलेली असेल. मात्र ही कोणत्याही प्रकारची प्रकाशयोजना नसून डोमिनो इफेक्टच आहे. आपली शक्कल लढवून ही हटके कलाकृती सगळ्यांनाच आश्चर्याचा धक्का देतेय. आपण पाहत असलेली गोष्ट कोणतीही प्रकाशयोजनेचा वापर करून बनवण्यात आली नसून ती केवळ एक डोमिनो इफेक्ट आहे हे पाहून सगळेच नेटिझन्स अवाक् झालेत. इंटरनेटवर हा व्हिडिओ जसा व्हायरल होऊ लागला तसा कलाकारवर स्तुतींचा वर्षाव सुरू झालाय. 


Get Latest Marathi News & Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and local news from all cities of Maharashtra.