चांगली नोकरी मिळावी, चांगला पगार मिळावा ही सर्वांचीच इच्छा असते. पण सर्वांनाच ते शक्य होत नाही. तशा तुम्ही अनेक गलेलठ्ठ पगारांच्या नोकरींबाबत ऐकलं असेल. पण एका नोकरीची सध्या चांगली चर्चा होत आहे. पण ही नोकरी भारतात नाही तर अमेरिकेत आहे. अमेरिकेतील कॅलिफोर्नियामध्ये एका आयलॅंडची रखवाली म्हणजेच देखभाल करण्यासाठी ९१ लाख रुपये पगार दिला जाणार आहे. आयलॅंड झकास आणि पगारही...मग काय मजाच....

(Image Credit : Facebook)

सीएनएनने दिलेल्या वृत्तानुसार, इस्ट ब्रदर लाइट स्टेशन सॅन पाब्लो खाडीमध्ये आहे. ही खाडी फ्रान्सिको खाडीचा भाग आहे. १८७४ मध्ये हे लाइटहाऊस सुरु झालं होतं. सॅन फ्रान्सिकोकडे जाणाऱ्या नाविकांसाठी थांबण्यासाठी हे सुरु करण्यात आलं होतं. 

दोघांमध्ये वाटला जाणार पगार

या लाइटहाऊसची देखभाल करण्यासाठी १,३०,००० डॉलर इतका पगार दिला जाणार आहे. हा पगार दोन लोकांमध्ये वाटला जाईल. भारतीय करंसीच्या हिशोबाने हा पगार ९१, ६४, ३५० रुपये इतका होतो. महत्त्वाची गोष्ट म्हणजे इथे अर्ज करणाऱ्यांना हॉस्पिटॅलिटीचा अनुभव असणं सुद्धा गरजेचं आहे. त्यासोबतच अमेरिकी कोस्ट गार्ड कमर्शिअल बोट ऑपरेटर लायसेन्सही गरजेचं आहे. 

लोकांना थांबण्याची सोय 

१९७९ मध्ये इथे लोकांच्या थांबण्याचीही व्यवस्था करण्यात आली. सध्या याची देखरेख इस्ट ब्रदर नावाची एक नॉन प्रॉफीट संस्था करत आहे. ४० वर्षांपासून काम करणारे टॉम बट्ट सांगतात की, आता त्यांनी रेव्हेन्यू जनरेट करण्याची नवीन पद्धत शोधून काढली आहे. बट्ट हेच या संस्थेचे मुख्य आहेत. 
 


Web Title: This us island is offering Rs 91 lakh salary to anyone who will look after the lighthouse
Get Latest Marathi News & Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and local news from all cities of Maharashtra.