सायकलला ११ मोबाइल बांधून गल्लोगल्ली फिरतात हे काका, जाणून घ्या कारण!

By ऑनलाइन लोकमत | Published: August 16, 2018 01:09 PM2018-08-16T13:09:43+5:302018-08-16T13:12:27+5:30

काही लोकांना एक फोन सांभाळणं कठिण होऊन बसतं पण तायवानचे ७० वर्षीय चेन सॅन-युआन हे त्याच्या सायकलला चक्क ११ मोबाइल बांधून घराबाहेर निघतात.

Taiwan man rigs bicycle with 11 phones to play Pokemon Go | सायकलला ११ मोबाइल बांधून गल्लोगल्ली फिरतात हे काका, जाणून घ्या कारण!

सायकलला ११ मोबाइल बांधून गल्लोगल्ली फिरतात हे काका, जाणून घ्या कारण!

Next

काही लोकांना एक फोन सांभाळणं कठिण होऊन बसतं पण तायवानचे ७० वर्षीय चेन सॅन-युआन हे त्याच्या सायकलला चक्क ११ मोबाइल बांधून घराबाहेर निघतात. हे असं का करतात याचं कारण वाचून तुम्हीही थक्क व्हाल. तर याचं उत्तर आहे गेम. या काकांना गेमची फार क्रेझ आहे. २०१६ साली आलेल्या पोकेमॉन गो गेमची त्यांना फार क्रेझ आहे. या गेममुळे अनेक अपघाताच्याही घटना समोर आल्या होत्या. पण हे काका या गेमचा पॉझिटीव्ह वापर करतात. चला जाणून घेऊ तो कसा? 

नातवाने शिकवला गेम

पोकेमॉन गो गेममध्ये तुम्हाला जास्तीत जास्त पोकेमॉन पकडायचे असतात. जे आजूबाजूच्या वस्तूंच्या रुपात असतात. यामुळेच हे काका सायकल ला स्मार्टफोन बांधून गल्लीबोळांमध्ये फिरत असतात. जेणेकरुन पोकेमॉन पकडले जावे. गंमतीदार बाब ही आहे की, हा गेम खेळणं त्यांना त्यांच्या नातवाने शिकवलं. 

हा गेम खेळण्याचे फायदे

हा गेम खेलायला सुरुवात केल्यावर तुम्ही त्यात हरवून जाता. तुम्हाला कशाचीही आठवण राहत नाही. पण हे काका या गेमचे फायदे सांगतात. ते म्हणाले की, हा गेम खेळण्याचे अनेक फायदे आहेत. आता लाइफ आधीपेक्षा अधिक हेल्दी झालं आहे. हा गेम खेळल्याने अल्झायमर(विसरण्याची सवय) होण्याचा धोका कमी होतो. तिसरी गोष्ट म्हणजे हा गेम खेळताना माझे काही नवीन मित्रही झाले आहेत. 

'अंकल पोकेमॉन' नावाने झाले प्रसिद्ध

तायवानच्या जनतेत हे काका चांगलेच प्रसिद्ध झाले आहेत. त्यांना अंकल पोकेमॉन म्हणून हाक मारली जाते. हे काका आपला हा शौक पूर्ण करण्यासाठी खर्चही मोठा करतात. ते यावर महिन्याला जवळपास ९५ हजार रुपये खर्च करतात. यात इंटरनेट, बॅटरी, मोबाईल आणि इतर खर्च आहे.

Web Title: Taiwan man rigs bicycle with 11 phones to play Pokemon Go

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.