#SHOCKING : या दोन जुळ्यांच्या जन्मात एका वर्षाचं अंतर

By ऑनलाइन लोकमत on Wed, January 03, 2018 3:16pm

कॅलिफोर्नियातील या दोन जुळ्यांना जन्म देताना त्यांच्या आईने एका वर्षाचा कालावधी लावला.

कॅलिफोर्नया : सगळ्यांना आश्चर्य वाटायला लावणारी ही घटना घडली आहे अमेरिकेतल्या कॅलिफोर्नियामध्ये. कॅलिफोर्नियामध्ये या जुळ्यांचा जन्म झाला पण त्यांच्या जन्मतारखेत एक वर्षाचं अंतर आहे. पहिल्या बाळाचा जन्म ३१ डिसेंबर २०१७ रोजी रात्री ११.५८ मिनिटांनी झाला तर दुसऱ्या बाळाचा १ जानेवारी २०१८ रोजी १२.१६ मिनिटांनी झाला. तसं पाहायला गेलं तर या दोघांच्या जन्मामध्ये १८ मिनिटांचा फरक आहे, पण तरीही यांच्या वाढदिवसाच्या तारखेत एक वर्षाचा फरक पडलाय.

आणखी वाचा - चीनमध्ये दोन जुळे अडकले जुळ्यांशी लग्नबंधनात, व्हिडीयो नेटवर व्हायरल

डेलिमेलने दिलेल्या वृत्तानुसार, कॅलिफोर्नियात राहणारी मारिया यांना २७ जानेवारीची प्रसुतीसाठी तारीख दिली होती. मात्र नववर्षाच्या पूर्वसंध्येला मारिया यांना प्रसुतीच्या कळा जाणवू लागल्या. त्यामुळे त्यांना त्वरीत हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आलं. त्यानंतर काही काळातच त्यांना एक मुलगी झाली. या मुलीचा जन्म ३१ डिसेंबर २०१७ रोजी रात्री ११.५८ मिनिटांनी झाला. पण १८ मिनिटांनी पुन्हा एका मुलीचा जन्म झाला. पण १८ मिनिटांनंतर लगेच दुसरं साल सुरू झालं होतं. त्यामुळे या दोन मुली जुळ्या म्हणून जन्माला आल्या असल्या तरीही त्यांच्यात एक वर्षांचं अंतर असल्याचं बोललं जात आहे. सुदैवाने या दोनही चिमुकल्या सुखरूप आहेत. 

आणखी वाचा - अबब..! वयाच्या 64 व्या वर्षी दिला जुळ्यांना जन्म

मारिया आणि त्यांचे पती शेतकरी आहेत. त्यांना आधीही एक मुलगी होती. आता या दोन चिमुकल्यांमुळे त्यांना तीन मुली झाल्यात. डॉक्टरांनी दिलेल्या माहितीनुसार, मारिया आणि तिच्या दोन्हीही मुली सुखरुप असून त्यांना घरी सोडण्यात आलंय. जोक्विन आणि एंटीना असं त्या चिमुकलींचं नाव ठेवण्यात आलंय. जोक्विनचं वजन २ किलो आहे आणि एंटीनाचं वजन १.८ किलो आहे. हा असा प्रकार पहिल्यांदाच घडलेला नाही. गेल्यावर्षीही असाच प्रकार घडला होता. जॉर्जिया, उताह, एरीजोना आणि सेन डिएगो या चार ठिकाणी चार जुळ्यांचा जन्म झाला होता. सेन डिएगोमध्ये २०१५-१६ च्या दरम्यान पहिल्यांदाच असं घडलं होतं.  

संबंधित

#Video : जीवाची बाजी लावत गोठलेल्या नदीतून वृध्द महिलेला काढले बाहेर
#SHOCKING : केस कापायला गेलेल्या ग्राहकाचा स्टायलिस्टने चक्क कापला कान
अमेरिकेत सरकारचे कामकाज बंद; खर्चास संमती नसल्याने शटडाउन
अमेरिका मोठ्या आर्थिक संकटात, 2013 नंतर पुन्हा 'शटडाउन'
पाकिस्तानचे वळवळणारे शेपूट पूर्ण ठेचल्याशिवाय कुरापती थांबणार नाहीत - उद्धव ठाकरे 

जरा हटके कडून आणखी

चोरी झाली दुनियेतील सर्वात महागडी वोडक्याची बाटली, किंमत ऐकुन व्हाल थक्क
इच्छा नसताना घेतलेल्या लॉटरी तिकिटाने केले श्रीमंत
पायलट मित्राने मैत्रिणीला केले विमानात प्रपोज, प्रवासीही झाले अचंबित
#Shocking : स्वत:च्याच लग्नात नाचता नाचता तिनं दिला बाळाला जन्म
कॅनडात तापमान -४० अंश, उकळत्या पाण्याचं झालं बर्फात रुपांतर

आणखी वाचा