'इथे' लागला मांस खाणाऱ्या झाडांचा शोध, २ वर्षात शोधली २०२ झाडं!

By ऑनलाइन लोकमत | Published: June 19, 2019 12:22 PM2019-06-19T12:22:16+5:302019-06-19T12:26:30+5:30

वैज्ञानिकांनी कॅनडापासून दूर एका परिसरात मांसभक्षी झाडाचा शोध लावला आहे. हे झाड पालीसारखे दिसणारे जीव सॅलामॅंडरला खातात.

Scientists discover a meat eating plant that feeds on salamanders in Canada | 'इथे' लागला मांस खाणाऱ्या झाडांचा शोध, २ वर्षात शोधली २०२ झाडं!

'इथे' लागला मांस खाणाऱ्या झाडांचा शोध, २ वर्षात शोधली २०२ झाडं!

Next

(Image Credit : www.vice.com)

वैज्ञानिकांनी कॅनडापासून दूर एका परिसरात मांसभक्षी झाडांचा शोध लावला आहे. हे झाड पालीसारखे दिसणारे जीव सॅलामॅंडरला खातात. हे झाड कॅनडाच्या एल्गोनकुइन प्रोव्हिंशिअल पार्कमध्ये शोधण्यात आलं आहे. या परिसरात फार दुर्मिळ झाडे आणि जीव आढळतात. हे ठिकाण वेगवेगळ्या जीवांच्या शोधाचं केंद्र आहे.  

(Image Credit : www.vice.com)

इकोलॉजी जर्नलमध्ये प्रकाशित शोधानुसार, गेल्या दोन वर्षांपासून या परिसरात शोध सुरू आहे. २०१७ मध्ये रिसर्च युनिव्हर्सिटी ऑफ गुएल्फच्या अभ्यासकांनी कॅनडामध्ये १४४ पिचर प्लांट पाहिले होते. या झाडांमध्ये ८ सॅलामॅंडरचे ६ जिवंत आणि २ मृत पिलं आढळली होती. ही माहिती आता जाहीर करण्यात आली आहे. इकोलॉजी जर्नलने सांगितले की, कधी अशा झाडांची केवळ कल्पना केली गेली होती, पण आता अभ्यासकांनी असे झाड जगासमोर आणलं आहे.

पिटफॉल ट्रॅप असंही या झाडाचं नाव

अभ्यासकांच्या टीमने ऑगल्ट आणि सप्टेंबर २०१८ मध्ये असे ५८ आणखी झाडांचा शोध लावला. यातील २० टक्के झाडांमध्ये सॅलामॅंडरचे पिले फसलेले आढळले. काही झाडांमध्ये एकापेक्षा अधिक सॅलामॅंडर होते. यातील काही झाडांमध्ये हे जीव १९ दिवसांपर्यंत जिवंत होते. तर काही तीन दिवसातच मरण पावले.

वैज्ञानिकांनुसार, या झाडांना पिटफॉल ट्रॅप असंही म्हटलं जातं. हे झाड दमट आणि कमी पोषक तत्व असलेल्या मातीत उगवतात. सामान्यपणे हे झाड कीटक आणि कोळी खातात. झाड या जीवांची शिकार पानांवर असलेला दवाच्या आणि पाण्याच्या माध्यमातून करतं. या झाडाच्या सुंगधामुळे आणि रंगामुळे कीटक याकडे आकर्षित होतात. जसे हे जीव झाडाजवळ येतात, ते कैद होतात. मग हळूहळू ते जीव सोडतात.

नायट्रोजनच्या कमतरतेमुळे असं होतं

मांस खाण्याचं कारण जमिनीत नायट्रोजनची कमतरता असणे हे आहे. नायट्रोजनची कमतरता झाडे कीटक आणि जीवांच्या माध्यमातून पूर्ण करते. एका अशाच मांसभक्षी झाडाचा शोध वैज्ञानिकांनी फिलीपिन्समध्ये लावला होता. हे झाड उंदीर खात होतं. 

Web Title: Scientists discover a meat eating plant that feeds on salamanders in Canada

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.