Sania's dance on Salman song, video viral on social media | VIDEO- सलमानच्या गाण्यावर सानियाचा बिनधास्त डान्स, सोशल मीडियावर व्हिडीओ व्हायरल

ठळक मुद्दे भारताची स्टार टेनिस प्लेयर सानिया मिर्झा तिच्या खेळाबरोबरच सोशल मीडियावरील तिच्या पोस्टमुळेही चर्चेत असते. सानिया इन्स्टाग्राम आणि ट्विटरच्या माध्यमातून तिच्या फॅन्सशी संवाद साधण्याचा नेहमी प्रयत्न करते.

मुंबई- भारताची स्टार टेनिस प्लेयर सानिया मिर्झा तिच्या खेळाबरोबरच सोशल मीडियावरील तिच्या पोस्टमुळेही चर्चेत असते. सानिया इन्स्टाग्राम आणि ट्विटरच्या माध्यमातून तिच्या फॅन्सशी संवाद साधण्याचा नेहमी प्रयत्न करते. तिच्या सोशल मीडियावरील पोस्टला फॅन्सकडूनही तितकीच पसंती मिळते नव्या वर्षाच्या निमित्ताने सानियाने आपल्या चाहत्यांना पुन्हा एकदा सोशल मीडियाच्या माध्यमातून खूश केलं आहे. आपल्या चाहत्यांना तिने नवीन वर्षानिमित्त एक भेट दिली आहे. तिने तिच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर आपला डान्स करतानाचा व्हिडीओ पोस्ट केला आहे. हा व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. यामध्ये सानिया सलमान खान आणि कतरिना कैफ यांच्या ‘टायगर जिंदा है’ या सिनेमातील 'स्वॅग से स्वागत' या गाण्यावर डान्स करताना दिसत आहे.

सानिया मिर्झा सध्या दुबईमध्ये असून तिथे ती डान्स क्लासमध्ये हा डान्स करत आहे. पहिल्यांदाच आपण अशाप्रकारे डान्स क्लासला प्रवेश घेतला असल्याचंही सानियाने म्हंटलं आहे. नव्या वर्षीचा डान्स असा असेल असं या व्हिडीओला सानियाने कॅप्शन दिलं आहे. सानियाच्या या व्हिडीओला नेटीझन्सने चांगलीच पसंती दिली आहे. सानियाच्या या व्हिडीओवर लोकांकडून लाईक्सचा पाऊस पडतो आहे. गुडघ्याला इजा झाल्यामुळे सानिया काही दिवसांपासून टेनिसपासून दूर होती. या दुखण्यामुळे ती ऑस्ट्रेलिया ओपनमध्येही खेळू शकली नाही. त्यामुळे सध्या ती काही दिवसांसाठी आराम करण्यासाठी दुबईमध्ये गेली आहे. काही दिवसांपुर्वीच तिने आपला दुबईतील एक फोटो शेअर करत तेथील स्नोची मजा घेत असल्याचे सोशल मीडियाच्या माध्यमातून सांगितलं होतं. त्यानंतर आता तिचा हा व्हिडिओ नेटीझन्सचं लक्ष वेधून घेत आहे.