दर २० हजार वर्षांनी हिरवागार होतं जगातलं सर्वात मोठं सहारा वाळवंट!

By ऑनलाइन लोकमत | Published: January 21, 2019 01:31 PM2019-01-21T13:31:11+5:302019-01-21T13:33:40+5:30

का रिसर्चमध्ये दावा करण्यात आला आहे की, सहारा मरुस्थल वाळवंट दर २० हजार वर्षांनी बदलतो. हे ठिकाण कधी ओसाड असतं तर कधी कधी हिरवंगार असतं.

Sahara swung between lush and desert conditions every 20 000 years says MIT study | दर २० हजार वर्षांनी हिरवागार होतं जगातलं सर्वात मोठं सहारा वाळवंट!

दर २० हजार वर्षांनी हिरवागार होतं जगातलं सर्वात मोठं सहारा वाळवंट!

googlenewsNext

एका रिसर्चमध्ये दावा करण्यात आला आहे की, सहारा मरुस्थल वाळवंट दर २० हजार वर्षांनी बदलतो. हे ठिकाण कधी ओसाड असतं तर कधी कधी हिरवंगार असतं. मॅसाच्यूसेट्स इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजीच्या रिसर्चमध्ये अभ्यासकांनी सांगितले की, मरुस्थलचा फार मोठा भाग उत्तर आफ्रिकेमध्ये आहे. जो नेहमी ओसाड नसतो. येथील दगडांवर असलेल्या पेंटींग आणि खोदकामातून मिळालेल्या पुराव्यातून हे दिसतं की, इथे पाणी होतं. मनुष्यासोबतच झाडे आणि जनावरांच्या प्रजाती सुद्धा होत्या. हा रिसर्च सायन्स अॅडवांसेसं मॅगझिनमध्ये प्रकाशित झाला आहे. 

एमआयटीच्या अभ्यासकांनी मरुस्थलच्या गेल्या २ लाख ४० हजार वर्षांचा इतिहास समजून घेण्यासाठी पश्चिम आफ्रिकेच्या किनाऱ्यांवर जमा झालेल्या धूळ आणि मातीचं विश्लेषण केलं. अभ्यासकांचं म्हणणं आहे की, प्रत्येक २० हजार वर्षात सहारा मरुस्थल आणि उत्तर आफ्रिकेत आलटून पालटून पाणी आणि दुष्काळ राहीला आहे. हा क्रम लागोपाठ होत होता. 

सूर्याची किरणे जबाबदार

रिसर्च रिपोर्टनुसार, पृथ्वी सूर्याच्या चारही बाजूने फिरते. वेगवेगळ्या वातावरणात सूर्याच्या किरणांचं वितरण प्रभावित होतं. प्रत्येक २० हजार वर्षात पृथ्वी अधिक उन्हाकडून कमी उन्हाकडे जाते. उत्तर आफ्रिकेत असं होतं. 

जेव्हा पृथ्वीवर उन्हाळ्यात सर्वात जास्त सूर्याची किरणे पडतात. तेव्हा मॉन्सूनची स्थिती निर्माण होते आणि या ठिकाणी पाऊस येतो. जेव्हा उन्हाळ्यात पृथ्वीपर्यंत येणाऱ्या सूर्याच्या किरणांचं प्रमाण कमी होतं, तेव्हा मॉन्सूनची हालचाल कमी होते. आणि दुष्काळाची स्थिती तयार होते. 

कसा लावला शोध?

दरवर्षी उत्तर-पूर्वेकडे चालणाऱ्या हवेमुळे लाखो टन वाळू अटलांटिक महासागराजवळ दक्षिण आफ्रिकेच्या किनाऱ्यावर जमा होते. धूळ-मातीचे हे ढीग उत्तर आफ्रिकेसाठी भौगोलिक प्रमाणाच्या रुपात कमा करतात.

वाळूच्या या थरांचा अभ्यास केल्यावर असं आढळलं की, इथे दुष्काळ होता आणि जिथे धूळ कमी आहे तिथे पाणी होतं असं आढळून येतं.सहारा मरुस्थलशी संबंधित रिसर्चचं नेतृत्व करणारे एमआयटीचे चार्लोट यांनी गेल्या २० लाख ४० हजार वर्षांपासून जमा वाळूच्या थरांचं विश्लेषण केलं.  

चार्लोट यांच्यानुसार, या थरांमध्ये धुळीसोबतच रेडिओअ‍ॅक्टिव पदार्थ थोरियमचे दुर्मिळ आयसोटोप सुद्धा आढळले. याच्या मदतीने धूळ-मातीच्या थरांची किती वेगाने निर्मिती झाली याची माहिती मिळाली. 

हजारो वर्ष जुन्या डोंगरांचं वय जाणून घेण्यासाठी यूरेनियम-थोरियम डेटिंग या तंत्राचा वापर केला जातो. रिसर्चनुसार, समुद्रात फार कमी प्रमाणात रेडिओअ‍ॅक्टिव पदार्थ यूरेनियम मिसळल्याने थोरियमचं निर्माण होत राहिलं. जे या थरांमध्ये आहे.

Web Title: Sahara swung between lush and desert conditions every 20 000 years says MIT study

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.