विक्रम ! प्रिया वारियरने फेसबुकचा मालक झुकरबर्गलाही टाकलं मागे, केला नवा कारनामा

By ऑनलाइन लोकमत on Thu, February 22, 2018 12:03pm

फॉलोअर्सच्या बाबतीत प्रिया वारियरने चक्क फेसबुकचा मालक मार्क झुकरबर्गलाही मागे टाकलं आहे.

'व्हॅलेंटाइन डे'च्याबरोबर एक दिवसआधी काही सेकंदांचा एक व्हिडीओ व्हायरल झाला आणि प्रिया प्रकाश वारियर हे नाव जगाला कळलं. व्हिडीओ व्हायरल झाल्याच्या अवघ्या 24 तासांमध्येच तिचे फॉलोअर्स बॉलिवूड, हॉलिवूड किंवा क्रीडा क्षेत्रातील अनेक दिग्गजांपेक्षाही जास्त झाले. 

आता प्रिया वारियरने एक नवा विक्रम केला आहे. सोशल नेटवर्किंग प्लॅटफॉर्म फेसबुक आणि इन्स्टाग्रामचा मालक मार्क झुकरबर्गलाही प्रियाने मागे टाकलं आहे. झुकरबर्गची मालकी असलेल्या इन्स्टाग्रामवर प्रियाचे फॉलोअर्स खुद्द झुकरबर्गपेक्षाही जास्त झाले आहेत.  इन्स्टाग्रामवर झुकरबर्गचे 40 लाख फॉलोअर्स आहेत, तर प्रियाचे फॉलोअर्स झपाट्याने वाढून तब्बल 45 लाखांहून जास्त झाले आहेत.

दिवसेंदिवस तिच्या चाहत्यांची संख्या वाढतच आहे. प्रिया वारियर हे देशातील कदाचित एकमेव असं व्यक्तिमत्व आहे जी अवघ्या 30 सेकंदांच्या एका व्हिडीओमुळे देशातील तरूणांच्या हृदयाची धडकन बनली. 

संबंधित

सावधान! तुमच्या प्रत्येक हालचालीकडे फेसबुकचे लक्ष
आता निष्काळजीपणे पोस्ट फॉरवर्ड करणे ठरेल संकटाचे
'फेसबुक'चा पुन्हा गोंधळ ! 14 मिलियन युजर्सचा खासगी डेटा झाला सार्वजनिक
आपण ते हमाल, भारवाही !
फेक फेसबूक प्रोफाइलवरून पत्नीने कंपनीत पाठवले अश्लील फोटो, पतीची गेली नोकरी 

जरा हटके कडून आणखी

जगातल्या या देशांकडे नाही आर्मी, दुसऱ्या देशांवर सुरक्षेची जबाबदारी!
'या' व्यक्तीला उन्हाळ्यात वाजते थंडी अन् थंडीत दरदरुन फुटतो घाम
1963 मधील फरारीवर आत्तापर्यंतची सर्वात जास्त बोली, किंमत वाचून व्हाल थक्क!
वाढत्या प्रसिद्धीमुळे 'डान्सिंग अंकल' हैराण; उचललं 'हे' पाऊल
12 वर्षातून एकदाच फुलतं हे फूल, यावेळी 8 लाख लोक बघण्यासाठी करणार गर्दी

आणखी वाचा