The pilot approached the air hostess on the plane and agreed | पायलट मित्राने मैत्रिणीला केले विमानात प्रपोज, प्रवासीही झाले अचंबित

ठळक मुद्देया विमानप्रवासात असा किस्सा घडला जो पाहून तेथील प्रवासी अचंबितच झाले.चक्क सगळ्या प्रवासांसमक्ष पायलटने एअर हॉस्टेसला प्रपोज केलं. अचानक घडलेल्या या प्रसंगामुळे एअर हॉस्टेसही चकीत झाली होती.तिने आपल्या फेसबुकवर हा व्हिडीयो पोस्ट केला असून तिच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.

डेट्रॉइट : पहिल्यांदा विमानाने प्रवास करणाऱ्यांना विमान प्रवास हवाहवासा वाटतो. पण नियमित विमानाने प्रवास करणाऱ्यांना नेहमीच प्रवासाचा कंटाळा येतो. पण डेट्रॉइट ते ओखलाहोमाला जाणाऱ्या एका विमानात असा किस्सा घडला जो पाहून तेथील प्रवासी अचंबितच झाले. चक्क सगळ्या प्रवासांसमक्ष पायलटने एअर हॉस्टेसला प्रपोज केलं. अचानक घडलेल्या या प्रसंगामुळे एअर हॉस्टेसही चकीत झाली होती.

आणखी वाचा - प्रेमात तोटा ! गर्लफ्रेंडला प्रपोज करताना दोन लाखांची अंगठी पडली नदीत

आणखी वाचा - गर्लफ्रेंडला प्रपोज करण्यासाठी खरेदी केले तब्बल २५ आयफोन एक्स

डेलिमेलने दिलेल्या वृत्तानुसार, डेट्रॉइट ते ओखलाहोमा असा विमानप्रवास सुरू होता. त्यावेळी लॉरेन गिब्स ही एअर हॉस्टेस आपल्या ड्युटीवर होती, तर पायलट म्हणून जॉन इमरसन काम पाहत होते. कामादरम्यानच पायलट जॉन इमरसन यांनी एअर हॉस्टेसला प्रपोज केलं. हे प्रपोजचं दृष्य एका कॅमेऱ्यातही कैद करण्यात आलंय. जेव्हा एअर हॉस्टेस लॉरेन गिब्सने हा व्हिडिओ सोशल मीडियावर टाकला, तेव्हा अनेकांनी तिच्यावर शुभेच्छांचा वर्षाव केला. ए‌वढंच नव्हे तर या व्हिडिओला आतापर्यंत दोन लाखांहून अधिक व्ह्यूज मिळाले आहेत, तर कित्येकांनी शेअरही केले आहेत. व्हिडीयो पाहण्यासाठी क्लिक करा - 

या व्हिडिओमध्ये असं दिसतंय की, सुरुतीला पायलट जॉन इमरसन प्रवाशांना सुचना देत आहेत. त्यानंतर ते म्हणाले की ‘आज लॉरेन आणि माझ्यासाठी स्पेशल दिवस आहे. तसंच प्रवाशांसाठीही आजचा दिवस लक्षात राहू देत. मला लॉरेनसोबत आयुष्य घालवायचं आहे.’ एवढं बोलून जॉनने खिशातून काहीतरी काढलं आणि लॉरेनसमोर गुडघ्यावर टेकून तिला प्रपोज केलं. यावेळी लॉरेनने तिला हिऱ्यांची अंगठीही दिली. हा सगळा प्रकार पाहून लॉरेनलाही आश्चर्य वाटलं. ती स्वप्नातच आहे की काय असं तिला वाटू  लागलं. पण तिनेही क्षणाचाही विचार न करता त्याचं प्रपोजल स्विकारलं. त्यानंतर जॉन पुन्हा म्हणाले की, ‘लॉरेनने हा म्हटलंय. तुम्ही ऐकलं का?’ हे ऐकल्यानंतर प्रवाशांनी एकच टाळ्यांचा कडकडाट केला. हा सगळा प्रकार लॉरेनने फेसबूकवर अपलोड केला आणि म्हणाली, ‘जॉनने विमानात प्रपोज केलं असलं तरीही आम्ही विमानात लग्न करणार नाही.’