पहिल्यांदाच जंगलात फिरताना दिसला रंगहीन दुर्मिळ पांडा, फोटो झाला व्हायरल

By ऑनलाइन लोकमत | Published: May 29, 2019 12:28 PM2019-05-29T12:28:14+5:302019-05-29T12:30:52+5:30

तुम्ही नेहमी पाहता तश्या पांडामुळे नाही तर एका दुर्मिळ पांडामुळे चर्चा सुरू आहे.

Pictures of Colorless albino giant panda seen in china forest | पहिल्यांदाच जंगलात फिरताना दिसला रंगहीन दुर्मिळ पांडा, फोटो झाला व्हायरल

पहिल्यांदाच जंगलात फिरताना दिसला रंगहीन दुर्मिळ पांडा, फोटो झाला व्हायरल

Next

चीन हा देश नेहमीच कधी वेगळ्या कारणांनी चर्चेत असतो. पांडा या प्राण्यामुळेही चीन नेहमीच चर्चेत असतो. पण यावेळी तुम्ही नेहमी पाहता तशा पांडामुळे नाही तर एका दुर्मिळ पांडामुळे चर्चा सुरू आहे. चीनमध्ये पहिल्यांदाच एका रंगहीन पांडाचं चित्र कॅमेरात कैद झालं आहे. अधिकाऱ्यांनी सांगितले की, एप्रिल महिन्यात सिचुआन प्रांतातील वोलोंग नॅशनल नेचर रिझर्व्हमध्ये इंफ्रारेड कॅमेराच्या मदतीने या पांडाचे फोटो घेण्यात आले.

बीजिंगच्या पेकिंग विश्वविद्यालयातील एक अभ्यासक ली शेंग यांनी सीएनएनशी बोलताना सांगितले की, याआधी जंगलात कधीही पूर्णपणे रंगहीन विशाल पांडा असल्याचं आढळलं नाहीये. ते म्हणाले की, 'पांडा सुदृढ दिसत होता आणि त्याचे पायही स्थिर होते. यावरू हे लक्षात येतं की, जेनेटिक म्यूटेशनमुळे त्याचं जीवन फारसं बाधित झालं नसणार. 

पांडा रिझर्व्ह क्षेत्राच्या विकासाचं निरीक्षण करण्यासाठी अधिक कॅमेरे लावण्याची योजना आखली जात आहे. सोबतच या माध्यमातून हे सुद्धा पाहिलं जाईल की, या रंगहीन पांडाचं या क्षेत्रातील इतर पांडांसोबत कसा संपर्क करतो. 

नॅशनल जिओग्राफीनुसार, रंगहीन असलेल्या प्राण्यांमध्ये मेलेनिनची कमतरता असते किंवा त्यांच्या त्वचेचा रंग द्रव्य असतो. त्यांच्या या वेगळेपणामुळे नेहमीच त्यांना जंगलातील शिकाऱ्यांचा अधिक धोका असतो. या प्राण्यांना सहजपणे पाहिलं जाऊ शकतं आणि त्यांच्या डोळ्यांचा प्रकाशही कमी असतो.

इंटरनॅशनल यूनियन फॉर कन्झर्वेशन ऑफ नेचर द्वारे या विशाल पांडाला असुरक्षित जीव म्हणून वर्गीकृत केलं आहे. वर्ल्ड वाइफ फंड फॉर नेचरनुसार, जंगलात यांची संख्या आता केवल १ हजार ८६४ इतकीच राहिली आहे.

Web Title: Pictures of Colorless albino giant panda seen in china forest

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.