The pair, who are in the discussion because of the beauty, are also difficult to identify who are the mother | सौंदर्यामुळे चर्चेत असते ही जोडी, कोण आई-कोण मुलगी ओळखणेही कठीण

ठळक मुद्देवयाच्या अवघ्या 19 व्या वर्षी रश्मी सचदेव यांचा दिल्लीच्या मनोज सचदेव यांच्याबरोबर विवाह झाला. मनोज पेशाने चार्टर्ड अकाऊंटट आहेत, लग्न झाले तेव्हा रश्मी ग्रॅज्युएशनच्या पहिल्या वर्षाला होत्या. 

जयपूर - मिस वर्ल्ड, मिस युनिव्हर्स या सौंदर्य स्पर्धांप्रमाणे विवाहित महिलांसाठी मिसेस युनिव्हर्स स्पर्धा आयोजित करण्यात येते. मंगळवारी मिसेस युनिव्हर्स युरो एशियाचा किताब जिंकणा-या रश्मी सचदेव जयपूर शहरात आल्या होत्या. रश्मी यांना एक मुलगी सुद्धा आहे. रश्मी यांच्याकडे पाहिल्यानंतर कोणालाही त्यांच्या वयाचा अंदाज येत नाही. त्यामुळे त्या एका मुलीच्या आई आहे हे सुद्धा कोणाला खरे वाटणार नाही. 

रश्मी आणि त्यांची मुलगी सोशल मीडियावर नेहमीच चर्चेत असतात. दोघींना एकत्र पाहिल्यानंतर कोण आई आणि कोण मुलगी असा प्रश्न तुम्हाला पडल्याशिवाय राहणार नाही ? दोघींचे सौदर्य पाहणा-याल चकीत करुन सोडते. मुलीच्याच सांगण्यावरुन रश्मी यांनी मॉडलिंगची करीयर म्हणून निवड केली आणि आज त्या या टप्प्याला पोहोचल्या आहेत.  

जाणून घ्या रश्मी यांच्याबद्दल काही खास गोष्टी 

- वयाच्या अवघ्या 19 व्या वर्षी रश्मी सचदेव यांचा दिल्लीच्या मनोज सचदेव यांच्याबरोबर विवाह झाला. मनोज पेशाने चार्टर्ड अकाऊंटट आहेत. लग्न झाले तेव्हा रश्मी ग्रॅज्युएशनच्या पहिल्या वर्षाला होत्या. 

- 13 सप्टेंबर 1995 साली रश्मी यांनी एका सुंदर मुलीला जन्म दिला. अस्का असे त्यांच्या मुलीचे नाव आहे. मुलीचा सांभाळ करत त्यांनी ग्रॅज्युएशन आणि इंटीरियर डिझायनिंगचा डिप्लोमा पूर्ण केला. 

- मुलगी अस्का 22 वर्षांची असून दिल्ली विद्यापीठात इंग्लिश ऑनर्सचे शिक्षण घेत आहे.                                                                             
- 2015 साली दिल्लीत मिसेस ब्युटी पेजेंट स्पर्धा आयोजित करण्यात आली होती. त्यामध्ये रश्मी यांची मैत्रीण सहभागी झाली होती. त्यावेळी अस्काने आईला सहभागी होण्यास सांगितले. सुरुवातीला रश्मी यांनी नकार दिला. पण मुलगी मागे लागल्यामुळे अखेर त्या स्पर्धेत सहभागी झाल्या व किताबही जिंकला. त्यानंतर त्यांनी एकापाठोपाठ एक सौदर्य स्पर्धांचे किताब जिंकले. मिसेस इंडिया, मिसेस आशिया इंटरनॅशनल, चीनमध्ये मिसेस युनिव्हर्स स्पर्धेत मिसेस युनिव्हर्स गोल्डन हार्टचा किताब त्यांना मिळाला.