१२१ वर्षांपासून पाकिस्तानात कैदेत आहे 'हे' झाड, इंग्रजांनी दिली होती झाडाला शिक्षा!

By ऑनलाइन लोकमत | Published: March 23, 2019 12:23 PM2019-03-23T12:23:18+5:302019-03-23T12:25:17+5:30

इंग्रजांची सत्ता भलेही संपली असो पण भारत आणि पाकिस्तानात असे काही नियम आणि कायदे आहेत जे इंग्रजांचं राज्य असतानापासून अजूनही सुरू आहेत.

OMG! This tree is under arrest in Pakistan for more than 100 years | १२१ वर्षांपासून पाकिस्तानात कैदेत आहे 'हे' झाड, इंग्रजांनी दिली होती झाडाला शिक्षा!

१२१ वर्षांपासून पाकिस्तानात कैदेत आहे 'हे' झाड, इंग्रजांनी दिली होती झाडाला शिक्षा!

Next

इंग्रजांची सत्ता भलेही संपली असो पण भारत आणि पाकिस्तानात असे काही नियम आणि कायदे आहेत जे इंग्रजांचं राज्य असतानापासून अजूनही सुरू आहेत. अशीच एक घटना पाकिस्तानातील आहे. एका कायद्यानुसार, पाकिस्तानच्या खैबर पख्तूनख्वा प्रांतातील एक वडाचं झाड गेल्या १२१ वर्षांपासून कैदेत आहे. प्रांतातील लंडी कोतलमध्ये हे झाड लोखंडी साखळ्यांनी बांधलेलं आहे. त्यावर एक पाठी असून 'I am under arrest' असं लिहिलेलं आहे. 

नशेत असलेल्या अधिकाऱ्याचा कारनामा

जेम्स स्क्विड नावाचा एक इंग्रज अधिकारी होता. एका रात्री तो फारच नशेत होता. अशात त्याला असं वाटलं की, एक झाड त्याच्या दिशेने येत आहे. अधिकारी घाबरला आणि सोबत असलेल्या जवानांना त्याने आदेश दिला की, या झाडा आत्ताच्या आत्ता अटक करा. बस तेव्हापासूनच हे झाड कैदेत आहे. 

काही तज्ज्ञांच्या मते हे झाड ड्रेकोनियन फ्रन्टिअर क्राइम रेग्युलेशन(एफसीआर) कायद्याचं उदाहरण आहे. हा कायदा ब्रिटीश शासनावेळी करण्यात आला होता. यानुसार ब्रिटीश सरकारला हा अधिकार होता की, ते पश्तून जनजातीच्या कोणत्याही व्यक्ती किंवा परिवाराने काही अपराध केला तर ते त्यांना शिक्षा देऊ शकतात. 

आश्चर्याची बाब म्हणजे एफसीआर कायदा अजूनही उत्तर-पश्चिम पाकिस्तानच्या काही भागात लागू आहे. या कायद्यामुळे परिसरातील लोक अनेक अधिकारांपासून वंचित राहतात. कायद्यानुसार गुन्ह्याचा कोणताही पुरावा नसेल तरी सुद्धा या परिसरातील लोकांना अटक केली जाऊ शकते. त्यामुळेचे एफसीआरला मानवाधिकारांचं उल्लंघन मानलं जातं. 

२००८ मध्ये पाकिस्तानचे तत्कालीन पंतप्रधान युसूफ रजा गिलानी यांनी एफसीआर कायदा रद्द करण्याची इच्छा व्यक्त केली होती. पण त्यावर पुढे काही झालं नाही. मात्र २०११ मध्ये एफसीआर कायद्यात काही सुधारणा करण्यात आल्या. यात जामीन मिळण्याची सुविधा देण्यात आली. आणखीही काही सुधारणा केल्या गेल्या. 

Web Title: OMG! This tree is under arrest in Pakistan for more than 100 years

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.