Navratri 2018 : सीमेपलिकडूनही 'ही' देवी करते देशाची सुरक्षा!

By ऑनलाइन लोकमत | Published: October 12, 2018 12:32 PM2018-10-12T12:32:28+5:302018-10-12T12:35:48+5:30

देशातील वेगवेगळ्या भागांमध्ये देवी दुर्गेची ५१ शक्तीपीठं आहेत. नवरात्रीनिमित्त हजारो भाविकांनी या पवित्र स्थळांना भेटी देण्यास सुरुवात केली आहे.

Navratri 2018: Hinglaj mata mandir in pakistan | Navratri 2018 : सीमेपलिकडूनही 'ही' देवी करते देशाची सुरक्षा!

Navratri 2018 : सीमेपलिकडूनही 'ही' देवी करते देशाची सुरक्षा!

googlenewsNext

देशातील वेगवेगळ्या भागांमध्ये देवी दुर्गेची ५१ शक्तीपीठं आहेत. नवरात्रीनिमित्त हजारो भाविकांनी या पवित्र स्थळांना भेटी देण्यास सुरुवात केली आहे. भारताबाहेरही काही शक्तीपिठं असून त्यातील एक पाकिस्तानातही आहे. हिंगलाज भवानीच्या रुपातील हे शक्तीपीठ बलूचिस्तानमध्ये हिंगोल नदीच्या किनारी आहे. 

असे मानले जाते की, जेव्हा देवी सती सती गेली तेव्हा भगवान विष्णुने भगवान शिवाचा मोह भंग करण्यासाठी आपल्या च्रकाने सतीच्या शरीराचे ५१ तुकडे केले होते. ज्या ज्या स्थानांवर देवीच्या अंगाचे तुकडे पडले तिथे शक्तीपिठं तयार झाली. यात पाकिस्तानचाही समावेश आहे. असे मानले जाते की, इथे देवीच्या डोक्याचा भाग पडला होता. 

महत्त्वाची बाब म्हणजे या मंदिरात मुस्लिमही मोठ्या श्रद्धेने येतात. तसेच येथील हिंदुंसाठी हे ठिकाण फार महत्त्वाचं आहे. मान्यता आहे की, श्रीरामानेही आपल्या वनवासादरम्यान या शक्तीपिठाला भेट दिली होती. 

असेही मानले जाते की, हिंगलाज मातेच्या या मंदिरात मनोरथ सिद्धीसाठी गुरु गोरखनाथ, गुरु नानक देव आमि दादा मखान यांच्यासारखे आध्यात्मिक संत सुद्धा येऊन गेलेत. हिंगलोज मातेचं दुसरं रुप तनोट मातेचं मंदिर भारतात आहे. तनोट मातेचं मंदिर जेसलमेर जिल्ह्यापासून साधारण १३० किमी अंतरावर आहे. 

१९६५ साली झालेल्या भारत-पाकिस्तान युद्धानंतर हे मंदिर देश-विदेशात चर्चेत आलं होतं. युद्धात पाकिस्तानी सेनेने जवळपास ३ हजार बॉम्ब टाकल्यानंतरही हे मंदिर चांगल्या स्थितीत होतं. इतकेच नाही तर मंदिराच्या परिसरातील ४५० बॉम्बचा स्फोटच झाला नाही.

हे बॉम्ब मंदिरातील संग्रहालयात भक्तांना बघण्यासाठी ठेवण्यात आले आहेत. कराचीपासून ६ ते ७ किमी चालून हाव नदी लागते. येथून माता हिंगलाजची यात्रा सुरु होते. 

Web Title: Navratri 2018: Hinglaj mata mandir in pakistan

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.