मालकाच्या कबुतरांना वाचवण्यासाठी माकडाने गमावला जीव

By ऑनलाइन लोकमत | Published: November 24, 2017 05:38 PM2017-11-24T17:38:06+5:302017-11-24T17:45:55+5:30

उत्तर कोलकाताच्या काशीपूरमधील उदयवाटी येथील ही घटना आहे. कबुतरांना चोरण्यासाठी काही चोर आले होते. पण माकडाने त्यांना कबुतरांना चोरण्यापासून रोखलं. कबुतरांना वाचवण्यासाठी या माकडाने...

Monkey lost his life to save the owner's doves | मालकाच्या कबुतरांना वाचवण्यासाठी माकडाने गमावला जीव

मालकाच्या कबुतरांना वाचवण्यासाठी माकडाने गमावला जीव

Next

कोलकाता : तुम्ही इमानदार कुत्र्यांबाबत नेहमी ऐकत आलात, पण कधी तुम्ही इमानदार माकडाविषयी ऐकलंय का?  कोलकातामध्ये एक पाळीव माकड आपल्या मालकाच्या कबुतरांना वाचवण्यासाठी थेट चोरांना भिडला. यामध्ये त्या माकडाचा दुर्देवी मृत्यू झालाय. मालकाने दिलेल्या तक्रारीवरून पोलिसांनी एका आरोपीला अटक केली आहे. 
उत्तर कोलकाताच्या काशीपूरमधील उदयवाटी येथील ही घटना आहे. कबुतरांना चोरण्यासाठी काही चोर आले होते. पण माकडाने त्यांना कबुतरांना चोरण्यापासून रोखलं. कबुतरांना वाचवण्यासाठी या माकडाने थेट चोरांवर हल्ला चढवला. स्वतःचा जीव जाईपर्यंत हा माकड चोरांसोबत लढत होता. माकडाने आडकाठी केल्यामुळे चोरांनी माकडाला मारहाण केली, त्यामध्ये त्याचा मृत्यू झाला. 
या प्रकरणी विकी नावाच्या एका व्यक्तीने काशीपूर पोलीस स्थानकात तक्रार दाखल केली आहे. तक्रारीनुसार, मोहम्मद नसीम नावाचा एक व्यक्ती त्याच्या सहका-यांसह कबुतरांना चोरी करण्यासाठी आला. यापूर्वीही नसीमने कबुतरांना चोरण्याचा प्रयत्न केला होता असं विकीने तक्रारीत म्हटलं आहे. कबुतरांना चोरण्याचा प्रय़त्न करत असताना माकडाने आरोपींवर हल्ला केला. माकडाच्या हल्ल्यातून वाचण्यासाठी आरोपींनी माकडाच्या पायावर जबर मारहाण केली. रात्रभर रक्तस्त्राव झाल्याने माकडाचा मृत्यू झाला, असा दावा विकीने केला आहे.  
 

Web Title: Monkey lost his life to save the owner's doves

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.