पाकिस्तानातील 'या' बाजारात स्मार्टफोनपेक्षाही स्वस्त मिळतात बंदुका!

By ऑनलाइन लोकमत | Published: October 23, 2018 01:34 PM2018-10-23T13:34:45+5:302018-10-23T13:39:13+5:30

दहशतवादाचा बालेकिल्ला समजल्या जाणाऱ्या पाकिस्तानमध्ये असाही एक परिसर आहे जिथे बंदुकांचा बाजार भरतो.

This market of Pakistan provides gun cheaper than a smartphone | पाकिस्तानातील 'या' बाजारात स्मार्टफोनपेक्षाही स्वस्त मिळतात बंदुका!

पाकिस्तानातील 'या' बाजारात स्मार्टफोनपेक्षाही स्वस्त मिळतात बंदुका!

Next

(Image Credit : dawn)

दहशतवादाचा बालेकिल्ला समजल्या जाणाऱ्या पाकिस्तानमध्ये असाही एक परिसर आहे जिथे बंदुकांचा बाजार भरतो. खरंतर ही तुमच्यासाठी आश्चर्यजनक असू शकतं पण पाकिस्तानसाठी नाही. हा धंदा गेल्याकाही वर्षांपासून इथे सुरु आहे. इतकेच नाही तर या बाजारात बंदुका इतक्या स्वस्त आहेत की, त्यांच्यासमोर स्मार्टफोनही महाग ठरतील. 

या शहराचं नाव आहे 'दर्रा आदम खेल' आहे आणि हे गाव खैबर पख्तून ख्वाह प्रांतात आहे. इथे बंदुका आणि पिस्तुला तयार करण्याचं काम अनेक वर्षांपासून सुरु आहे. महत्त्वाची बाब म्हणजे या बाजारात अमेरिका, यूरोप आणि चीनी पिस्तुलांची कॉपी केली जाते. 

(Image Credit : nbcnews )

या बाजारातील कारागिरांचं काम फार प्रसिद्ध आहे. पाकिस्तानातील लोक येथून बंदुका आणि पिस्तुलांची ऑर्डर देतात. शेजारील देशही यांच्याक़डून बंदुकांची खरेदी करण्यासाठी उत्सुक असतात, पण कठोर नियमांमुळे असं होऊ शकत नाही. 

(Image Credit : nbcnews)

इथे बंदुका तयार करण्याच्या कारागिरांमध्ये अनेक लहान मुलांचाही समावेश आहे. नवीन पिढीही यात लोटली जात आहे. इथे बंदुका आणि पिस्तुलांसोबतच काडतूसही तयार केले जातात. 

(Image Credit : dawn)

हा बेकायदेशीरपणे चारणारा बंदुकांचा सर्वात मोठा धंदा मानला जातो. इथे याची एक इंडस्ट्रीच तयार झाली असून हजारो लोक इथे काम करतात.  

Web Title: This market of Pakistan provides gun cheaper than a smartphone

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.