भारतीयाचा लंडनमध्ये बोलबाला; १ हजार कोटीला खरेदी केली इमारत अन् बनवलं आलिशान हॉटेल

By ऑनलाइन लोकमत | Published: March 26, 2019 02:44 PM2019-03-26T14:44:28+5:302019-03-26T14:48:51+5:30

वेगवेगळ्या देशांमध्ये भारतीय वंशाचे श्रीमंत लोक नेहमीच वेगवेगळ्या कारणांनी चर्चेत असतात. आता लंडनमधील अशाच एका भारतीय श्रीमंत व्यक्तीची चर्चा रंगली आहे.

Indian billionnaire Yusufalli Kader acquired london police great scotland yard converted into luxury hotel | भारतीयाचा लंडनमध्ये बोलबाला; १ हजार कोटीला खरेदी केली इमारत अन् बनवलं आलिशान हॉटेल

भारतीयाचा लंडनमध्ये बोलबाला; १ हजार कोटीला खरेदी केली इमारत अन् बनवलं आलिशान हॉटेल

Next

(Image Credit : Connected To India)

वेगवेगळ्या देशांमध्ये भारतीय वंशाचे श्रीमंत लोक नेहमीच वेगवेगळ्या कारणांनी चर्चेत असतात. आता लंडनमधील अशाच एका भारतीय श्रीमंत व्यक्तीची चर्चा रंगली आहे. या भारतीय व्यक्तीने लंडनमधील एक ऐतिहासिक इमारत खरेदी करून या इमारतीला हॉटेलमध्ये रुपांतरित केलं.  

महत्त्वाची बाब म्हणजे या हॉटेलमध्ये एक रात्र राहण्यासाठी एक व्यक्तीला ९ लाख रूपये द्यावे लागणार असे बोलले जात आहे. ग्रेट स्कॉटलॅंड यार्ड नावाच्या या इमारतीमध्येच लंडन मट्रोपॉलिटन पोलिसाचं मुख्यालय होतं.

(Image Credit : hindi.scoopwhoop.com)

साधारण ६० वर्षांपर्यंत लंडन मेट्रोपॉलिटन पोलीस इथे होते. १८९० मध्ये पोलिसांनी ही इमारत रिकामी केली होती. त्यानंतर भारतीय अब्जाधीश युसूफली कादर यानी २०१५ ही इमारत साधारण १ हजार कोटी रूपयांना खरेदी केली. 

त्यानंतर या इमारतीचं पूर्णपणे रिनोवेशन केलं गेलं. आता ही इमारत एक लक्झरी हॉटेल झालीये. यावर्षी या हॉटेलचं उद्घाटन होणार आहे. मीडिया रिपोर्टनुसार, लंडनच्या प्रॉपर्टी मार्केटमध्ये एका भारतीयाकडून करण्यात आलेली ही सर्वात मोठी गुंतवणूक आहे. 

(Image Credit : hindi.scoopwhoop.com)

यूसुफली कादर भारतातील केरळमधील आहेत आणि आबू धाबीमध्ये त्यांची लूलू ग्रुप नावाची कंपनी आहे. त्यांनी लंडनमधील ही इमारत गलिआर्ड होम्स नावाच्या कंपनीकडून खरेदी केली आहे. या इमारतील हॉटेलमध्ये रुपांतरित करण्यासाठी तब्बल ६८० कोटी रूपये खर्च आल्याचा बोललं जात आहे. 

हॉटेलमध्ये साधारण १५० रूम्स तयार करण्यात आल्या आहेत. या रूम्स आधी गुन्हेगारांना ठेवण्यासाठी वापरल्या जात होत्या. हॉटेलमध्ये खास बार, टील पार्लर आणि रेस्टॉरन्ट तयार करण्यात आले आहे. या इमारतीचं बांधकाम १८२९ मध्ये करण्यात आलं होतं.  

 

Web Title: Indian billionnaire Yusufalli Kader acquired london police great scotland yard converted into luxury hotel

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.