Holi 2019 : नॅचरल कलर्स खरेदी करण्यासाठी काही टिप्स; दुकानदार फसवू शकणार नाही!

By ऑनलाइन लोकमत | Published: March 18, 2019 05:00 PM2019-03-18T17:00:36+5:302019-03-18T17:01:27+5:30

होळीचा सण काही दिवसांवर येऊन ठेपला आहे. अशातच बाजारात मिळणाऱ्या केमिकलयुक्त कलर्सच्या वापराऐवजी ऑर्गॅनिक कलर्सचा वापर करण्याकडे लोकांचा वाढता कल दिसत आहे.

Holi special 2019 : how to buy natural or organic colours | Holi 2019 : नॅचरल कलर्स खरेदी करण्यासाठी काही टिप्स; दुकानदार फसवू शकणार नाही!

Holi 2019 : नॅचरल कलर्स खरेदी करण्यासाठी काही टिप्स; दुकानदार फसवू शकणार नाही!

googlenewsNext

(Image Credit : thegreenearthorganic.com)

होळीचा सण काही दिवसांवर येऊन ठेपला आहे. अशातच बाजारात मिळणाऱ्या केमिकलयुक्त कलर्सच्या वापराऐवजी ऑर्गॅनिक कलर्सचा वापर करण्याकडे लोकांचा वाढता कल दिसत आहे. हे कलर्स फक्त व्यक्तीला केमिकलयुक्त प्रोडक्ट्सपासून होणाऱ्या नुकसानापासून बचाव करण्याचं काम करत नाही तर त्यांचा सुगंध होळीचा आनंद द्विगुणित करण्यासाठी मदत करतो. यावर्षी तुम्हीही होळीसाठी नॅचरल कलर्सचा वापर करण्याच्या विचारात असाल तर आम्ही तुम्हाला काही टिप्स सांगणार आहोत, ज्यांच्या मदतीने तुम्ही बाजारात मिळणाऱ्या नैसर्गिक आणि केमिकलयुक्त कलर्समध्ये फरक करू शकता. 

कलर्स खरेदी करताना टिप्स ठरतील फायदेशीर :

1. पॅकेटवर जरी नॅचरल रंग असं लिहिलं असेल परंतु, त्यातील इन्ग्रीडियेंट्स एकदा तपासून पहा. ज्यामुळे हे ठरवणं सोपं जाईल की, त्या कलरमध्ये एखादं केमिकल तर नाही ना?

2. गेल्या काही वर्षांपासून नैसर्गिक रंगांची मागणी वाढत आहे. अशातच आयुर्वेदिक ब्रँड्सही होळीसाठी बाजारात ऑर्गेनिक कलर्स बाजारामध्ये आणतात. अशावेळी तुम्हाला माहीत असणाऱ्या आणि नावाजलेल्या ब्रँडच्या रंगांची निवड करा. त्यामुळे हे रंग नॅचरल असण्यासोबतच चांगल्या क्वालिटीचेही असतात. 

3. काही नॅचरल कॉस्मेटिक कंपन्यादेखील होळीच्या मुहुर्तावर रंग तयार करतात. ज्या मार्केटमध्ये अगदी सहज उपलब्ध होतात. 

4. रंग खरेदी करताना त्याचं पॅकेट तपासून पाहा. त्यावर ऑर्गेनिक होण्याचं सर्टिफिकेट आहे की, नाही ते तपासून पाहा. जर त्यावर एखादं सर्टफिकेट किंवा सील असेल तर तुम्ही बिनधास्त खरेदी करू शकता. 

5. ऑनलाइन नॅचरल कलर्स अगदी सहज उपलब्ध होतात. फक्त लक्षात ठेवा की, ब्रँड आणि त्याबाबतची इतर माहिती इत्यादी तपासून पाहा. 

6. डिस्काउंट मिळवण्याच्या आशेपोटी तुम्ही एक्सपायर झालेले रंग तर नाही ना विकत घेत आहात? याची खात्री करून घ्या. कारण कलर्स जरी 100 टक्के नॅचरल असले तरिही एक्सपायर झाल्यानंतर त्यांचा वापर करणं त्वचेसाठी घातक ठरू शकतं. 

7. रंग खरेदी केल्यानंतर दुकानदाराकडून अवश्य बिल घ्या. जर त्याने तुम्हाला नॅचरल कलर्सऐवजी केमिकलयुक्त रंग विकले, तर बिल असल्यामुळे तुम्ही ते परत करू शकता. 

Web Title: Holi special 2019 : how to buy natural or organic colours

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.