वाह! हुंडा घेण्यास नवरदेवाने दिला नकार, सासरच्या लोकांनी दिली १ लाखांची १ हजार पुस्तके! 

By ऑनलाइन लोकमत | Published: May 22, 2019 03:58 PM2019-05-22T15:58:09+5:302019-05-22T16:00:52+5:30

हुंडा घेणे हा गुन्हा आहे हे सर्वांनाच माहीत आहे. पण आजही समाजात हुंडा घेतला जातो आणि त्यासाठी सुनेचा छळही केला जातो.

Groom receives 1000 new books worth rupees 1 lakh from in laws | वाह! हुंडा घेण्यास नवरदेवाने दिला नकार, सासरच्या लोकांनी दिली १ लाखांची १ हजार पुस्तके! 

वाह! हुंडा घेण्यास नवरदेवाने दिला नकार, सासरच्या लोकांनी दिली १ लाखांची १ हजार पुस्तके! 

googlenewsNext

हुंडा घेणे हा गुन्हा आहे हे सर्वांनाच माहीत आहे. पण आजही समाजात हुंडा घेतला जातो आणि त्यासाठी सुनेचा छळही केला जातो. हव्या असलेल्या सर्व गोष्टी हुंड्याच्या स्वरूपात मागितल्या जातात. पण, पश्चिम बंगालच्या सोनारपूरमध्ये एक वेगळीच घटना घडली आहे. येथील एका शिक्षकाने हुंडा घेण्यास नकार दिला. त्यानंतर वरात जेव्हा लग्न स्थळी पोहोचली तेव्हा वधूकडील लोकांनी नवरदेवाला १ लाख रूपये किंमतीची १ हजार पुस्तके गिफ्ट दिली. 

सूर्यकांत नावाच्या शिक्षकाचं लग्नपश्चिम बंगालच्या खेजुरीमध्ये पार पडलं. तो जेव्हा मंगल कार्यालयात वरात घेऊन पोहोचला तेव्हा आत पुस्तकांचा मोठा ढीग पडला होता. हे पाहून सूर्यकांत हैराण झाला. ही ती पुस्तके होती जी त्याला सासरकडून गिफ्ट देण्यात आली होती. 

सूर्यकांत सांगतो की, 'मी आधीच सांगितलं होतं की, मी कोणत्याही प्रकारचा हुंडा घेणार नाही. पण जेव्हा मी हॉलमध्ये पोहोचलो तेव्हा मी हैराण झालो'. सूर्यकांतला वाचण्याची खूप आवड आहे. त्याच्या पत्नीचं नाव आहे प्रियंका. ती सांगते की, हुंडा नाकारल्याने तिला फार आनंद झाला. तिलाही वाचनाची आवड आहे. ती सध्या बीए तीसऱ्या वर्षाला आहे.

या पुस्तकांमध्ये बंगाली साहित्य आहे. रविंद्रनाथ टागोर, बकिंमचंद्र चट्टोपाध्याय आणि शरतचंद्र चट्टोपाध्याय यांची यात पुस्तके आहेत. खरंतर कोणत्याही प्रकारच्या हुंड्याऐवजी अशाप्रकारे पुस्तके गिफ्ट करणे ही खरंच चांगली संकल्पना आहे. 

Web Title: Groom receives 1000 new books worth rupees 1 lakh from in laws

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.