Video : माणसाच्या आकाराची सर्वात मोठी जेली फिश कॅमेरात कैद, ४५ किलो असू शकतं वजन!

By ऑनलाइन लोकमत | Published: July 17, 2019 01:05 PM2019-07-17T13:05:36+5:302019-07-17T13:12:31+5:30

ही जेली फिश अशी प्रजाती आहे, जी आकाराने सर्वात मोठी असते. याला बॅरेल जेलीफिशही म्हणतात. ही खासकरून ब्रिटनमध्ये आढळते.

Giant jellyfish as big as diver appears off cornish coast watch video | Video : माणसाच्या आकाराची सर्वात मोठी जेली फिश कॅमेरात कैद, ४५ किलो असू शकतं वजन!

Video : माणसाच्या आकाराची सर्वात मोठी जेली फिश कॅमेरात कैद, ४५ किलो असू शकतं वजन!

Next

(Image Credit : MSN.com)

इंग्लंडच्या कार्नविलमध्ये दीड मीटर लांब माणसाच्या उंची एवढी जेली फिश आढळली आहे. पाण्यात खोलवर डायव्हिंग करताना ही जेली फिश टिव्ही प्रेझेंटर लिजीने पाहिलं. लिजीनुसार, त्याने पहिल्यांदाच इतकी मोठी जेली फिश पाहिली. सध्या या जेली फिशचे फोटो सोशल मीडियात व्हायरल झाले आहेत.

सर्वात मोठ्या आकाराच्या जेली फिशची प्रजाती

लिजी टिव्ही प्रेझेंटर असण्यासोबतच लिजी हा एक जैव संरक्षणकर्ता आहे. त्याच्यानुसार, वाइल्ड ओशियन वीक अभियानादरम्यान त्याने त्याच्याजवळून एक मोठी जेली फिश जाताना पाहिली. ही जेली फिश कॅमेराज कैद करण्यासाठी त्याना २ तास लागले.

(Image Credit : Yahoo News UK)

मॅरीन एक्सपर्टनुसार, ही जेली फिश अशी प्रजाती आहे, जी आकाराने सर्वात मोठी असते. याला बॅरेल जेलीफिशही म्हणतात. ही खासकरून ब्रिटनमध्ये आढळते. या जेली फिशचं वजन ४५ किलोग्रॅमपर्यंत असतं आणि रूंदी साधारण ९० सेंटीमीटरपर्यंत असते.

बॅरेल जेली फिश ही सर्वात जास्त ब्रिटनच्या कॉर्नविलमध्ये आढळतात. गेल्या १५ वर्षांच्या तुलनेत गेल्या काही दिवसांमध्ये या फिश कॉनवेलमध्ये अनेकदा बघायला मिळाल्या. मात्र, ब्रिटन आढळलेला हा पहिला मोठा समुद्री जीव नाहीये. याआधी ८ फुटाची १३३ किलो वजनी शार्क पोर्टलॅंडमध्ये आढळली होती. जी ग्रेट व्हाइट शार्कची एक प्रजाती होती.

मॅरी एक्सपर्टनुसार, बॅरेल जेली फिशचे स्टींग फार कमजोर असतात, त्यामुळे ती मनुष्याला अधिक नुकसान पोहचवू शकत नाही. ही फिश समुद्रातील फार छोट्या जिवांना खाते. ही फिश उन्हाळ्यात ब्रिटनच्या तटावर बघायला मिळते.

Web Title: Giant jellyfish as big as diver appears off cornish coast watch video

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.