तुम्हाला कुत्रा आवडतो की नाही हे 'या' गोष्टीवर असतं अवलंबून!

By ऑनलाइन लोकमत | Published: May 23, 2019 06:32 PM2019-05-23T18:32:29+5:302019-05-23T18:36:56+5:30

घरात कुत्रा पाळणे ही अनेकांची आवड असते तर काही लोक कुत्र्यांना बघताच दूर पळू लागतात. वैज्ञानिकांनी यामागचं कारण शोधून काढलं आहे.

Gene's responsible for dog ownership says study | तुम्हाला कुत्रा आवडतो की नाही हे 'या' गोष्टीवर असतं अवलंबून!

तुम्हाला कुत्रा आवडतो की नाही हे 'या' गोष्टीवर असतं अवलंबून!

Next

(Image Credit : purina.co.uk)

घरात कुत्रा पाळणे ही अनेकांची आवड असते तर काही लोक कुत्र्यांना बघताच दूर पळू लागतात. वैज्ञानिकांनी यामागचं कारण शोधून काढलं आहे. रिसर्चमधून त्यांना असं आढळून आलं की, जर तुम्हाला कुत्रा आवडत असेल तर याला तुमचे जीन्स जबाबदार असतात. स्वीडिश संशोधकांनी ३५ हजार ०३५ आयडेंटिकल आणि फ्रॅटर्नल ट्विन्सचा(जुळ्यांचा) डेटाबेस चेक केला, हे ट्विन्स १९२६ ते १९९६ दरम्यान जन्माला आले होते. त्यांनी सरकारी रजिस्टर आणि कॅनल क्लबमधून माहिती मिळवली की, कुणाकडे कुत्रा होता आणि कुणाकडे नाही. 

(Image Credit : Female First)

आयडेंटिकल ट्विन्स ज्यांचे जीन्स १०० टक्के एकसारखे असतात ते फ्रेटर्नल ट्विन्सच्या तुलनेत जास्त एकमेकांसारखे असतात. फ्रॅंटर्नल ट्विन्सचे ५० टक्के जीन्स एकसारखे असतात. ट्विन्सचं वातावरणही एकसारखंच असतं, त्यामुळे जर काही लक्षणे जेनेटिक असतील तर आयडेंटिकल ट्विन्स पूर्णपणे एकसारखे असतील.

(Image Credit : PetGuide)

सायन्टिफिक रिपोर्ट्समध्ये प्रकाशित रिसर्चमधून समोर आलं की, जर फीमेल आयडेंटिकल ट्विन्सपैकी एकाजवळ कुत्रा आहे तर ४० टक्के शक्यता अशी असते की, दुसऱ्या ट्विनकडेही कुत्रा असणार. तेच फ्रॅटर्नल फीमेल केसमध्ये ही शक्यता केवळ २५ टक्के असते. 
तेच जर एक मेल आयडेंटिकल ट्विनजवळ कुत्रा असेल तर दुसऱ्या ट्विनजवळ कुत्रा असण्याची शक्यता २९ टक्के असते. आणि जर फ्रॅटर्नल मेलमध्ये बघायचं तर ही शक्यता १८ टक्केच असते. वेगळ्या शब्दात सांगायचं तर कुत्रा पाळणे किंवा त्यांची आवड असणे हे फार जास्त जीन्सवर अवलंबून असतं. 

(Image Credit : BarkForce)

अभ्यासकांना असेही आढळले की, महिलांमध्ये कुत्रा पाळण्याच्या प्रकरणांमध्ये ५७ टक्के जेनेटिक्स जबाबदार असतात, तर पुरुषांमध्ये ही टक्केवारी ५१ टक्के असते. या अभ्यासाचे मुख्य लेखक प्राध्यापक फाल सांगतात की, 'काही लोकांना कुत्रे पसंत असतात, तर काहींना नाही. आमचा रिसर्च हे सांगते की, हा फरक आनुवांशिकतेने मिळणाऱ्या गोष्टींवरच सांगितलं जाऊ शकतं. तेच वरिष्ठ लेखक पॅट्रिक सांगतात की,  या रिसर्चमधून हे समोर येत की, कोणते जीन्स हा फरक ठरवतात. 

Web Title: Gene's responsible for dog ownership says study

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.