फेसबूक, व्हॉट्सअॅपच्या अॅडिक्टने त्रस्त आहात, मग इथे दहा दिवसांत सुटेल तुमचे व्यसन

By ऑनलाइन लोकमत on Mon, February 19, 2018 3:35pm

इंटरनेटचा विस्तार झाल्यापासून फेसबूक आणि व्हॉट्स अॅपचा वापर बेसुमार वाढला आहे. दिवसांतील बहुतांश काळ ऑनलाइन असल्याने अनेकांना इंटरनेटचे व्यसन जडले आहे.

गाझियाबाद - इंटरनेटचा विस्तार झाल्यापासून फेसबूक आणि व्हॉट्स अॅपचा वापर बेसुमार वाढला आहे. दिवसांतील बहुतांश काळ ऑनलाइन असल्याने अनेकांना इंटरनेटचे व्यसन जडले आहे. कितीही प्रयत्न केले तरी सोशल मीडियापासून दूर राहणे अशा व्यक्तींसाठी कठीण बनले आहे. अशा व्यक्तींचे  इंटरनेटचे व्यसन सोडवण्यासाठी चक्क एक इंटरनेट व्यसनमुक्ती केंद्र उभारण्यात आले आहे. वाचून आश्चर्य वाटलं असेल ना, पण ही बातमी खरी आहे.  आतापर्यंत तुम्ही दारू, तंबाखू यांचे व्यसन सोडवणाऱ्या केंद्रांविषयी वाचलं, ऐकलं असेल. जाहीराती पाहिल्या असतील. काही जणांचा या केंद्रांशी प्रत्यक्ष संबंधही आला असेल. पण इंटरनेटचे व्यसन सोडवणारे केंद्र गाझियाबाद येथे  सुरू करण्यात आले आहे.  तसेच दिल्लीमधील एम्स रुग्णालयातही या केंद्राकडून समुपदेशनाचे वर्ग घेतले जात आहेत. सोशल मीडियावर सतत  अॅक्टिव्ह असलेल्या व्यक्तींना इंटरनेटपासून कशाप्रकारे दूर राहता येईल, याचं मार्गदर्शन करण्यात येत आहे. तसेच इंटरनेटचे व्यसन जडलेल्या व्यक्तींचे व्यसन उपचारानंतर केवळ दहा दिवसांत दूर करू असा दावा या केंद्राकडून करण्यात आला आहे.  दरम्यान, इंटनेटचे व्यसन हे दारूपेक्षाही धोकादायक असल्याचे मत डॉक्टरांनी व्यक्त केले आहे. एकवेळ दारू सोडणे सोपे पण इंटरनेटचे व्यसन सुटता सुटत नाही, असे डॉक्टरांनी सांगितले आहे.  

संबंधित

सोशल मिडियाला आले प्रेमाचे भरते....ओसंडून वाहताहेत ‘व्हॅलेंटाईन’चे वॉलपेपर
इंटरनेटवर रातोरात स्टार झालेली प्रिया प्रकाश अडचणीत, गाण्यातील आक्षेपार्ह शब्दांमुळे तक्रार दाखल

जरा हटके कडून आणखी

लग्नाच्या दिवशीच महिलेने मोडलं लग्न, कारण वाचून व्हाल थक्क
ऐकावं ते नवलंच!; बाळाच्या नामकरणासाठी चक्क मतदान
पहिल्याच डेटला तरुणीची फसवणूक, हॉटेलचं बिल न देताच पार्टनर फरार!
'हॅलो फ्रॅण्ड्स चाय पिलो' बोलणाऱ्या भाभीचा सोशल मीडियावर धुमाकूळ, जाणून घ्या ती महिला आहे तरी कोण?
ऑफिसमधील अखेरच्या दिवशी त्यानं आणला घोडा

आणखी वाचा