Facebook, with WhitsAhead's addiction, will drop your addiction here in ten days | फेसबूक, व्हॉट्सअॅपच्या अॅडिक्टने त्रस्त आहात, मग इथे दहा दिवसांत सुटेल तुमचे व्यसन
फेसबूक, व्हॉट्सअॅपच्या अॅडिक्टने त्रस्त आहात, मग इथे दहा दिवसांत सुटेल तुमचे व्यसन

गाझियाबाद - इंटरनेटचा विस्तार झाल्यापासून फेसबूक आणि व्हॉट्स अॅपचा वापर बेसुमार वाढला आहे. दिवसांतील बहुतांश काळ ऑनलाइन असल्याने अनेकांना इंटरनेटचे व्यसन जडले आहे. कितीही प्रयत्न केले तरी सोशल मीडियापासून दूर राहणे अशा व्यक्तींसाठी कठीण बनले आहे. अशा व्यक्तींचे  इंटरनेटचे व्यसन सोडवण्यासाठी चक्क एक इंटरनेट व्यसनमुक्ती केंद्र उभारण्यात आले आहे. वाचून आश्चर्य वाटलं असेल ना, पण ही बातमी खरी आहे. 
आतापर्यंत तुम्ही दारू, तंबाखू यांचे व्यसन सोडवणाऱ्या केंद्रांविषयी वाचलं, ऐकलं असेल. जाहीराती पाहिल्या असतील. काही जणांचा या केंद्रांशी प्रत्यक्ष संबंधही आला असेल. पण इंटरनेटचे व्यसन सोडवणारे केंद्र गाझियाबाद येथे  सुरू करण्यात आले आहे.  तसेच दिल्लीमधील एम्स रुग्णालयातही या केंद्राकडून समुपदेशनाचे वर्ग घेतले जात आहेत. सोशल मीडियावर सतत  अॅक्टिव्ह असलेल्या व्यक्तींना इंटरनेटपासून कशाप्रकारे दूर राहता येईल, याचं मार्गदर्शन करण्यात येत आहे. तसेच इंटरनेटचे व्यसन जडलेल्या व्यक्तींचे व्यसन उपचारानंतर केवळ दहा दिवसांत दूर करू असा दावा या केंद्राकडून करण्यात आला आहे. 
दरम्यान, इंटनेटचे व्यसन हे दारूपेक्षाही धोकादायक असल्याचे मत डॉक्टरांनी व्यक्त केले आहे. एकवेळ दारू सोडणे सोपे पण इंटरनेटचे व्यसन सुटता सुटत नाही, असे डॉक्टरांनी सांगितले आहे.  


Web Title: Facebook, with WhitsAhead's addiction, will drop your addiction here in ten days
Get Latest Marathi News & Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and local news from all cities of Maharashtra.