वडिलांच्या मृत्यूनंतरही मुलीला मिळत होते गिफ्ट्स, वाचा कसं शक्य झालं हे ?

By ऑनलाइन लोकमत | Published: December 6, 2017 02:47 PM2017-12-06T14:47:20+5:302017-12-06T15:36:32+5:30

कॅन्सरग्रस्त वडिलांचा मृत्यू झाल्याने तिचे बरेच वाढदिवस पालकांविना गेले. ते तिच्यासाठी दु:खी दिवस होते.

dead dad was gifting daughter birthday gifts for 5 years | वडिलांच्या मृत्यूनंतरही मुलीला मिळत होते गिफ्ट्स, वाचा कसं शक्य झालं हे ?

वडिलांच्या मृत्यूनंतरही मुलीला मिळत होते गिफ्ट्स, वाचा कसं शक्य झालं हे ?

googlenewsNext
ठळक मुद्देवडिलांच्या निधनानंतरही तिला तिच्या वडिलांकडून गिफ्ट्स मिळत होते. प्रत्येक वाढदिवशी ती ही गोष्ट सोशल मीडियावर टाकत होती. पण यंदाच्या तिच्या या पोस्टला लाखोंहून अधिक लाईक्स मिळाले आहेत.वडीलांच्या पश्चातही ते आपल्यासोबत आहेत, हीच भावना कोणत्याही मुलीसाठी मोठी असते.

अमेरिका : आपल्या वाढदिवशी आपल्या आई-बाबांकडून खास गिफ्ट मिळावं असं प्रत्येकाला वाटतं. पण आई-बाबाच या जगात नसतील तर वाढदिवसाला गिफ्ट कोण देणार? त्यामुळे आई-बाबांच्या निधनामुळे पोरके झालेल्या प्रत्येकाच्या डोळ्यात या दिवशी पाणी असतंच. पण अमेरिकेत एका वडिलांनी आपल्या मृत्यूनंतरही आपल्या लेकीला वाढदिवसादिवशी गिफ्ट पाठवण्याचा पायंडा चालू ठेवला आहे. हे वाचल्यावर तुम्हाला आश्चर्य वाटणं साहजिक आहे. कारण एकदा पृथ्वीतलावरून गेलेला व्यक्ती पुन्हा कसा काय येऊन लेकीला गिफ्ट देऊ शकतो ?

फॉक्स १३ यांनी दिलेल्या वृत्तानुसार, अमेरिकेत राहणाऱ्या सायकोलॉजीचं शिक्षण घेणाऱ्या बेली सेलर या तरुणीने नुकताच तिचा २१ वा वाढदिवसा साजरा केला. यावेळी तिने ट्विटवर अशी माहिती दिली की तिच्या बाबाचं ५ वर्षांपूर्वीच कॅन्सरमुळे निधन झालं होतं. त्यावेळी बेली अवघ्या १६ वर्षांची होती. तिचे बाबा दरवर्षी तिचा वाढदिवस अगदी धुमधडाक्यात साजरा करायचे. पण त्यांच्या निधनानंतर तिचा वाढदिवस कोण साजरा करणार या विचारांनी त्यांनी पुढच्या ५ वर्षांसाठीचे पुष्पगुच्छ आधीच बुक करून ठेवले होते. दरवर्षी तिच्या वाढदिवासाला हे बुके तिच्या घरी पोहोचत. आपल्या मृत्यू आधीच एका वडिलांनी आपल्या लेकीची एवढी सोय करून ठेवली होती, यावरूनच त्या दोघांमधलं नातं स्पष्ट होतं. 

पण बेली आता थोडी नाराज आहे. कारण तिचा आता २१ वाढदिवस नुकताच साजरा झाला. तिचे वडिल वारल्यानंतर तिला बुकेसोबतच एक पत्रही मिळत होतं. मात्र यावेळेस आलेलं पत्र वाचून ती थोडी हिरमुसली.



 

या पत्रात तिच्या वडिलांनी म्हटलं आहे की, ‘हे माझं शेवटचं पत्र. यापुढे माझ्याकडून तुला कोणतीही भेटवस्तु किंवा पत्र येणार नाही. मी तुझ्या जगात नाहीए याचं दु:खं करून घेऊ नकोस. तू तुझं आयुष्य अगदी मजेत जग. मी अगदी योग्य ठिकाणी आहे. त्यामुळे माझीही काळजी करू नकोस.’

आणखी वाचा - सौंदर्यामुळे चर्चेत असते ही जोडी, कोण आई-कोण मुलगी ओळखणेही कठीण

२०१२ साली बेलीच्या वडिलांना कॅन्सर झाला होता. वडिलांच्या निधनानंतरही तिला तिच्या वडिलांकडून गिफ्ट्स मिळत होते. प्रत्येक वाढदिवशी ती ही गोष्ट सोशल मीडियावर टाकत होती. पण यंदाच्या तिच्या या पोस्टला लाखोंहून अधिक लाईक्स मिळाले आहेत. नेटीझन्सने तिच्या भावना समजून घेतल्याने तीही खूश आहे. वडीलांच्या पश्चातही ते आपल्यासोबत आहेत, हीच भावना कोणत्याही मुलीसाठी मोठी असते, त्यामुळे वडिलांनी मृत्यूआधीच आपल्या पुढच्या ५ वर्षांच्या वाढदिवसाची गिफ्ट्स आगाऊ बुक करून ठेवली असल्याने बेलीला या गोष्टीचा फार आनंद आहे. 

आणखी वाचा - बुध्दमंदिराबाहेर अश्लिल फोटो काढल्याप्रकरणी दोघांना एअरपोर्टवरुन अटक

Web Title: dead dad was gifting daughter birthday gifts for 5 years

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.