गायीच्या पोटातील अँटीबॉडीज एडस या रोगावर आहेत परिणामकारक - अमेरिकेतील संशोधन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 24, 2017 12:45 AM2017-07-24T00:45:04+5:302017-08-21T17:16:36+5:30

अमेरिकेतील संशोधकांनी असा दावा केला आहे की, गायीच्या पोटातील अँटीबॉडीज (प्रतिद्रव्य) एडस्वर परिणामकारक उपचार करु शकतात.

Cow is curable on AIDS? | गायीच्या पोटातील अँटीबॉडीज एडस या रोगावर आहेत परिणामकारक - अमेरिकेतील संशोधन

गायीच्या पोटातील अँटीबॉडीज एडस या रोगावर आहेत परिणामकारक - अमेरिकेतील संशोधन

Next

अमेरिकेतील संशोधकांनी असा दावा केला आहे की, गायीच्या पोटातील अँटीबॉडीज (प्रतिद्रव्य) एडस्वर परिणामकारक उपचार करु शकतात. त्यामुळे असाध्य समजल्या जाणाऱ्या एडस्वर गाय गुणकारी ठरण्याची शक्यता आहे. स्वसंरक्षणासाठी गाय अशा प्रकारचे अँटीबॉडीज तयार करते. हेच द्रव्य एडस्वर औषध ठरु शकते, असा दावा अमेरिकेतील ‘नॅशनल इन्स्टिट्यूट आॅफ हेल्थ’ने केला आहे. तर, ‘इंटरनॅशनल एडस् वॅक्सिन इनिशिएटिव्ह’ आणि ‘द स्क्रिप्स रिसर्च इंन्स्टिट्यूट’ यांनी गायीच्या या औषधावर चाचणी सुरु केली आहे. एक संशोधक डॉ. डेव्हिन सोक यांनी सांगितले की, या द्रव्याचे परिणाम आश्चर्यचकीत करणारे आहेत. मानवी शरीरात अँटीबॉडीज विकसित होण्यास काही वर्ष लागतात. पण, गायीच्या शरीरात असे अँटीबॉडीज काही आठवड्यातच बनतात. या संशोधकांनी असा दावा केला आहे की, गायीचे अँटीबॉडीज एडस्चा प्रभाव ४२ दिवसात २० टक्क्यांपर्यंत संपवू शकतात. प्रयोगशाळेतील तपासणीतून हे आढळून आले आहे की, ३८१ दिवसात हे अँटीबॉडीज एडस्ला ९६ टक्के पर्यंत निष्क्रिय करतात.

Web Title: Cow is curable on AIDS?

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.