तशी वेळ आली होती... म्हणून या जोडप्याने केलं टॉयलेटमध्ये लग्न

By ऑनलाइन लोकमत on Thu, February 08, 2018 8:52pm

सर्वकाही सुरळीत सुरू होतं. सर्व जण आनंदात होते पण लग्नाला थोडाच अवधी बाकी असताना...

अमेरिकेच्या न्यू जर्सीमध्ये एक विचित्र लग्न पार पडलं. येथे एका जोडप्यावर चक्क टॉयलेटमध्येच लग्न करण्याची वेळ आली. या घटनेमध्ये न्यायाधीशालाही टॉइलेटमध्ये जाऊन लग्न लावून द्यावं लागलं.   टॉयलेटमध्ये लग्न करणा-या नववधूचं नाव मारिया शुलज आणि वराचं नाव ब्रायन असल्याची माहिती आहे. मिळालेल्या माहितीनुसार, लग्नादरम्यान अचानक एक वेगळाच प्रसंग झाला.  ब्रायन आणि मारिया न्यू जर्सी येथील  मॉनमाउथ काउंटी कोर्ट हाउसमध्ये लग्न करण्यास पोहोचले. सर्वकाही सुरळीत सुरू होतं. सर्व जण आनंदात होते पण लग्नाला थोडाच अवधी बाकी असताना ब्रायनच्या आईची प्रकृती बिघडली. टॉइलेटमध्ये असताना त्यांना अस्थमाचा अटॅक आला. आईची प्रकृती बिघडल्याचं समजताच ब्रायनने टॉइलेटमध्ये धाव घेतली. श्वास घेण्यास त्रास होत असल्यामुळे ब्रायनच्या आईला ऑक्सिजन देण्यास सुरूवात झाली, आणि अॅम्ब्युलन्सही बोलावण्यात आली.  उपस्थित सर्वजण चिंतेत होते, पण लग्न आजच लागावं अशीही सर्वांची मनोमन इच्छा होती. कारण तेथील नियमानुसार जर लग्न टाळलं असतं तर पुन्हा लग्नाच्या परवान्यासाठी पुढील 45 दिवस वाट पाहावी लागली असती. तसंच लग्नामध्ये आईची उपस्थिती अनिवार्य होती, कारण लग्नाच्या परवान्यावर त्यांची स्वाक्षरी होती.  अखेर विचारपूर्वक महिलांच्या टॉयलेटमध्येच लग्न करण्याचा निर्णय घेण्यात आला. द्विधा मनःस्थितीत असलेले वधू आणि वर दोघंही तयार झाले, आई तेथेच होती, न्यायाधिशांनीही परवानगी दिली आणि अखेर टॉयलेटमध्येच हे अनोखं लग्न पार पडलं. त्यानंतर आईला दवाखान्यात दाखल करण्यात आलं.  या दोघांच्या या वेगळ्या लग्नाचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.  2 जानेवारीची ही घटना आहे.

संबंधित

'त्या' चोरट्याला पकडण्यासाठी तब्बल 3000 पोलिसांची फौज
स्वातंत्र्यदिनीच पाकिस्तान दिवाळखोरीच्या उंबरठ्यावर, कर्जासाठी पुन्हा हात पसरावे लागणार
नोबेल पुरस्कार विजेते लेखक व्ही.एस. नायपॉल कालवश
नासाचे ऐतिहासिक उड्डाण, सूर्याच्या दिशेने झेपावले 'सोलर प्रोब यान'
विमान कंपनीच्याच कर्मचाऱ्याने चोरले विमान

जरा हटके कडून आणखी

१५०० किलो सोन्याने तयार केलंय हे मंदिर, जाणून घ्या कुठे आहे हे मंदिर! 
प्रेयसीबद्दल १४४ वाक्यं लिहिण्याची शिक्षा... चमकलात?; कारण वाचून हसाल!
'या' पाच देशांमध्ये मिळतो सर्वात जास्त पगार!
दुबईत लॅम्बॉर्गिनी पळवणं पर्यटकाला पडलं महागात, ३ तासात ३१ लाखांचा दंड!
भारतातील 'या' राज्यातील काही गावांत स्त्रिया ब्लाऊजशिवायच नेसतात साडी!

आणखी वाचा