बाबो! कॉलेजच्या तरुणांनी असा लावला Apple कंपनीला ६२ कोटींचा चूना!

By ऑनलाइन लोकमत | Published: April 6, 2019 01:13 PM2019-04-06T13:13:44+5:302019-04-06T13:20:17+5:30

चीनच्या २ इंजिनिअर्सनी जगातली सर्वात प्रसिद्ध मोबाइल कंपनी Apple ला ७,९५,८०० डॉलरचा(६२ कोटी रूपये) चूना लावलाय.

Chinese students dupe apple company out of 62 crore in fake iphone replacements | बाबो! कॉलेजच्या तरुणांनी असा लावला Apple कंपनीला ६२ कोटींचा चूना!

बाबो! कॉलेजच्या तरुणांनी असा लावला Apple कंपनीला ६२ कोटींचा चूना!

googlenewsNext

चीनच्या २ इंजिनिअर्सनी जगातली सर्वात प्रसिद्ध मोबाइल कंपनी Apple ला ८,९५,८०० डॉलरचा( जवळपास ६२ कोटी रूपये) चूना लावलाय. अमेरिकेतच शिक्षण घेणाऱ्या या दोन तरूणांनी फसवणुकीचा हा कारभार २०१७ मध्ये सुरू केला होता. हे दोघेही डुप्लिकेट आयफोनला खऱ्या आयफोनसोबत बदलण्याचं काम करत होते. नंतर ओरिजिनल मोबाइल विकून पैसे कमावत होते. Apple ला ठगवणाऱ्या या तरुणांचं नाव यांग्याग जोहू आणि क्वान जियांग आहे. जोहूने ऑरेगन यूनिव्हर्सिटीमधून शिक्षण पूर्ण केलं. तर क्वान बेंटन कॉलेजमध्ये शेवटच्या सेमिस्टरला आहे. 

असा लावला Apple ला चूना

दोन्ही तरूण चीनहून डुप्लिकेट आयफोन मागवत होते आणि अ‍ॅप्पलच्या सर्व्हिस सेंटरला जाऊन सांगत होते की, हा आयफोन स्विच ऑन होत नाहीये. अशात सर्व्हिस सेंटरचे लोक त्यांना नवीन फोन देत होते. अ‍ॅप्पल त्यांच्या फोनमध्ये बिघाड झाल्यास तो फोन रिपेअर करण्याऐवजी नवा फोन देतात. यासाठी पुरावा म्हणून बिलाचीही गरज नसते. 

'या' गोष्टीचा उचलला फायदा

चीनमध्ये तयार केले जाणारे डुप्लिकेट आयफोनची ओळख पटवणं कठीण आहे. कारण या फोनसाठी वापरल्या जाणाऱ्या गोष्टी या खऱ्या आयफोनसारख्याच असतात. अशावेळी हे फोन सेंटिग्स आणि सिरिअल नंबरने ओळखले जाऊ शकतात. ज्यासाठी मोबाइल ऑन असणे गरजेचे आहे. पण दोघेही स्टोरमध्ये हेच सांगत होते की, आयफोन सुरु होत नाहीये आणि कंपनी त्यांना नवीन फोन देत होती.

कंपनीने केले १, ४९३ आयफोन रिप्लेस

दोन्ही तरूणांनी अ‍ॅप्पलच्या वेगवेगळ्या सर्व्हिस सेंटरमध्ये जाऊन ३, ०६९ आयफोन रिप्लेस करण्यासाठी दिले, ज्यातील १, ४९३ फोन अ‍ॅप्पलने बदलून दिले. नवीन फोन मिळाल्यावर हे फोन ते चीनला पाठवून देत होते. जे विकून त्यातून मिळणारे पैसे त्यांच्या अमेरिकन बॅंक अकाऊंटमध्ये टाकले जात होते. 

कसे आले जाळ्यात

२०१७ मध्ये अमेरिकन कस्टम एजन्सीने हॉंगकॉंगहून आलेले ५ पार्सल पकडले. ज्यावर ब्रॅंडिंग अ‍ॅप्पलची होती. पण आत डुप्लिकेट आयफोन होते. या प्रकरणाची चौकशी करताना एजन्सीने क्वान जियांगला या पार्सलबाबत विचारपूस केली. तेव्हा समोर आलं की, त्याच्याकडे चीनहून दर महिन्याला २० ते ३० असेच आयफोन येतात. हे तो स्टोरमध्ये रिप्लेस करून परत पाठवतो.

अ‍ॅप्पलने पाठवली नोटीस

जून २०१७ मध्ये अ‍ॅप्पलने क्वानला डुप्लिकेट आयफोन रिप्लेसमेंट प्रकरणी नोटीस पाठवली होती. या नोटीसला त्याने काहीच उत्तर दिलं नाही. खरंतर तो कधी कधीच स्टोरमध्ये फोन रिप्लेस करायला जात होता. कारण तो अ‍ॅप्पलच्या ऑनलाइन सर्व्हिसमधून एका एजंटला घरी बोलवून फोन रिप्लेसमेंटचं काम सहजपणे करत होता. 

आता अ‍ॅप्पलने दोघांविरोधातही केस केली आहे. दोन्ही तरूणांनी त्यांच्या बचावासाठी सांगितले की, चीनहून येणारे आयफोन डुप्लिकेट होते हे त्यांना माहीत नव्हतं. त्यांना हे सांगून फोन पाठवले जात होते की, हे फोन ओरिजिनल आहेत आणि ऑन होत नाहीयेत. मग ते फोन अमेरिकेतून बदलून घ्यायचे. 

Web Title: Chinese students dupe apple company out of 62 crore in fake iphone replacements

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.