दोघांनाही कळत नाही एकमेकांची भाषा, गुगल ट्रान्सलेटच्या मदतीने फुललं प्रेम!

By ऑनलाइन लोकमत | Published: January 9, 2019 12:02 PM2019-01-09T12:02:23+5:302019-01-09T12:05:28+5:30

संवाद हा प्रत्येक नात्यासाठी महत्त्वाचा असतो. पण प्रेमाला भाषेची सीमा नसते हे तुम्ही अनेकदा ऐकलं असेल.

This british women and italian men fell in love they used google translate understand their language | दोघांनाही कळत नाही एकमेकांची भाषा, गुगल ट्रान्सलेटच्या मदतीने फुललं प्रेम!

दोघांनाही कळत नाही एकमेकांची भाषा, गुगल ट्रान्सलेटच्या मदतीने फुललं प्रेम!

googlenewsNext

संवाद हा प्रत्येक नात्यासाठी महत्त्वाचा असतो. पण प्रेमाला भाषेची सीमा नसते हे तुम्ही अनेकदा ऐकलं असेल. अशीच एक प्रेमकथा आहे ब्रिटनच्या मुलाची आणि इटलीच्या मुलीची. दोघेही एकमेकांची भाषा समजू शकत नाहीत. पण प्रेमात पडले. अशात त्यांनी त्यांचं हे प्रेम फुलवण्यासाठी मदत घेतली ती गुगल ट्रान्सलेटची. 

Chloe Smith आणि Daniele Marosco दोघे पहिल्यांदा २०१७ मध्ये फिरायला गेले असताना भेटले. दोघांनाही एकमेकांची भाषा समजत नव्हती, पण एकमेकांकडे आकर्षित होते. हळूहळू त्यांना एकमेकांना जाणून घ्यायचं घेतं. त्यामुळे त्यांनी एकमेकांची भाषा समजून घेण्यासाठी गुगल ट्रान्सलेटची मदत घेतली. 

Chloe Smith आणि Daniele Marosco दोघे एकत्र सिनेमे बघू लागले. जेणेकरुन एकमेकांची भाषा शिकता यावी. सुट्टी सोबत घालवल्यावर दोघांनी एकमेकांच्या परिवारासोबतही वेळ घालवला. दोघांच्या परिवारातील लोकही या दोघांच्या नात्याबाबत आश्चर्यचकित झाले आहेत. 

Daniele हा इटलीचा आहे. आता त्याला Chloe इंग्रजी शिकवते. तर तो तिला इटालियन भाषा शिकवतोय. सध्या दोघेही लंडनमध्ये राहत आहेत. नोकरी करत आहेत. Chloe मेकअप आर्टीस्ट आहे तर Daniele हा एका हॉटेलमध्ये काम करतो. पण दोघांनी एकमेकांना वेळ देणं महत्त्वाचं समजलं, भाषा अडसर ठरली नाही. आता त्यांनी कोणत्याही भाषेचा क्लास न लावता त्यांचं नातं मजबूत केलं आहे. तेही केवळ गुगल ट्रान्सलेटच्या मदतीने. 

Web Title: This british women and italian men fell in love they used google translate understand their language

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.