महिलेने सवतीच्या फेसबुक फोटोवर केली वाईट कमेंट, २ वर्ष तुरुंगवासाची शिक्षा!

By ऑनलाइन लोकमत | Published: April 12, 2019 04:24 PM2019-04-12T16:24:40+5:302019-04-12T16:29:39+5:30

एका महिलेला सवतीच्या फोटोवर अपशब्द वापरुन कमेंट करणे पडले महागात.

British Woman Jailed in Dubai for Calling Ex-husband's New Wife a 'Horse' on Facebook | महिलेने सवतीच्या फेसबुक फोटोवर केली वाईट कमेंट, २ वर्ष तुरुंगवासाची शिक्षा!

महिलेने सवतीच्या फेसबुक फोटोवर केली वाईट कमेंट, २ वर्ष तुरुंगवासाची शिक्षा!

Next

दुबईमध्ये आपल्या घटस्फोटीत पतीच्या दुसऱ्या पत्नीसाठी फेसबुकवर वादग्रस्त शब्द वापरल्याने एका ब्रिटीश महिलेला २ वर्षांची शिक्षा मिळाली आहे. सोबतच तिने सोशल मीडियावरच घटस्फोटीत पतीला 'इडियट' असंही म्हटलं होतं. याच घटस्फोटीत पतीच्या अंत्यसंस्काराहून परत येत असताना लालेह शाहर्वेश(५५) हिला दुबई एअरपोर्टवर अटक करण्यात आली होती. अटक करण्यात आल्यावर साधारण एका महिन्याने महिलेला जामीन देण्यात आला आहे.

२०१६ मध्ये घटस्फोटीत पतीने फेसबुकवर दुसऱ्या पत्नीसोबतचा फोटो शेअर केला होता. त्यावर या महिलेने कमेंट केली होती. आता याप्रकरणी तीन वर्षांनी निर्णय आला असून कोर्टाकडून महिलेला दोन वर्षांची शिक्षा सुनावण्यात आली होती. सोबतच जवळपास ८२० डॉलरचा दंडही ठोठावण्यात आल्याचं बोललं जात आहे. महिलेला तिच्या १४ वर्षांच्या मुलीसोबत दुबईमध्ये अटक करण्यात आली होती. महिलेल्या घटस्फोटीत पतीच्या दुसऱ्या पत्नीने तीन वर्ष जुन्या फेसबुक पोस्टबाबत तक्रार केली होती. 

(लालेह शाहर्वेश मुलीसोबत)

रिपोर्ट्सनुसार, ब्रिटनमध्ये राहणारी लालेह शरावेश(५५) आणि तिच्या घटस्फोटीत पतीचा १८ वर्षांपूर्वी विवाह झाला होता. लग्नानंतर ८ महिने ती संयुक्त अरब अमिरातीमध्ये थांबली होती. आपल्या मुलीसोबत महिला ब्रिटनला परत गेली होती. पण तिचा पती तिथेच थांबला होता. त्यानंतर दोघांनी घटस्फोट घेतला होता. लालेहने घटस्फोटीत पतीच्या दुसऱ्या पत्नीला 'घोडी' म्हटलं होतं. डेली मेलने दिलेल्या वृत्तानुसार, लालेह घटस्फोटीत पतीच्या अंत्यसंस्कारासाठी यूएईला आली होती.

(Image Credit : abpananda.abplive.in)

फेसबुकवर फोटो शेअर केलेल्या फोटोवरुन महिलेला घटस्फोटीत पतीने दुसरं लग्न केल्याचं कळालं होतं. या फोटोवर लालेह यांनी फारसी भाषेत टिका केली होती. ज्यातील एक कमेंट मुर्ख ही होती. तर तू मला या घोडीसाठी सोडलं. मला आशा आहे की, तू जमिनीत जाशील. तेव्हाच लालेहला कळालं की, तिच्या विरोधात तक्रार करण्यात आली आहे. लालेहच्या मुलीला ब्रिटनला जाण्याची परवानगी देण्यात आली आहे. पण लालेह यांचा पासपोर्ट ताब्यात घेण्यात आला होता. मात्र आता जामीनानंतर तिला घरी जाण्याची परवानगी मिळाली आहे.

लालेहने इंग्लंडमध्ये राहूनच फेसबुकवर पोस्ट केली होती. त्यावेळी तिला असंकाही होईल याची कल्पनाही नव्हती. तिला जराही कल्पना नव्हती की, सोशल मीडियातील पोस्टमुळे तिच्यावर दुबईमध्ये केस होऊ शकते. संयुक्त अरब अमीरातीच्या सायबर कायद्यानुसार, सोशल मीडियावर जर कुणी एखाद्या व्यक्तीसाठी अपशब्द वापरले तर त्या व्यक्तीला तरुंगवासाची शिक्षा आणि दंड भरावा लागतो. 

Web Title: British Woman Jailed in Dubai for Calling Ex-husband's New Wife a 'Horse' on Facebook

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.