वाह रे नशीब! ८५० रूपयांना घेतलेली अंगठी विकायला गेली होती महिला आणि...

By ऑनलाइन लोकमत | Published: February 9, 2019 01:10 PM2019-02-09T13:10:08+5:302019-02-09T13:20:51+5:30

आयुष्यात कधी कुणाचं नशीब कसं चमकेल याचा काही नेम नसतो. असंच काहीसं एका महिलेसोबत झालंय. ब्रिटनमधील एका महिलेला कधीकाळी हिऱ्याची अंगठी खरेदी करायची होती.

Britain woman who bought a ring for 12 dollars 30 years ago finds out its worth a fortune | वाह रे नशीब! ८५० रूपयांना घेतलेली अंगठी विकायला गेली होती महिला आणि...

वाह रे नशीब! ८५० रूपयांना घेतलेली अंगठी विकायला गेली होती महिला आणि...

Next

आयुष्यात कधी कुणाचं नशीब कसं चमकेल याचा काही नेम नसतो. असंच काहीसं एका महिलेसोबत झालंय. ब्रिटनमधील एका महिलेला कधीकाळी हिऱ्याची अंगठी खरेदी करायची होती. पण त्यावेळी तिच्याकडे इतके पैसे नव्हते की, ती तिची इच्छा पूर्ण करू शकेल. मग तिने हिऱ्यासारखी दिसणारी एक ८५० रूपयांची एक अंगठी खरेदी केली. पण ३० वर्षांनी या ८५० रूपयांच्या अंगठीने तिचं नशीब चमकलं. 

अंगठी विकायला गेली आणि....

काही वर्षांनी ही महिला ती ८५० रूपयांच्या अंगठीला कंटाळली. मग तिने ही अंगठी विकण्याचा निर्णय घेतला. यासाठी ती एका ज्वेलरला भेटली. ज्वेलरने अंगठी पाहिली आणि महिलेला अंगठी विकण्याचं कारण विचारलं. महिलेने सांगतिलं की, ही अंगठी डुप्लिकेट हिऱ्याची आहे. फार वर्षांपासून ती ही अंगठी वापरत होती, त्यामुळे तिला आता ही विकायची आहे. 

सत्य जाणून बसला धक्का

महिलेची पूर्ण म्हणणं ऐकून घेतल्यावर दुकानदाराने तिला सांगितले की, ही अंगठी डुप्लिकेट नाहीये. ही अंगठी खऱ्या हिऱ्याची आहे. पण महिलेला यावर काही विश्वास बसेना. पण दुकानदाराने तिला विश्वास दिल्यावर महिलेला धक्काच बसला. थोडा आराम केल्यावर दुकानदाराने महिलेला सांगितले की, ही अंगठी २६.२७ के कॅरेट डायमंडची आहे.  

किंमत वाचून आणखी एक धक्का

त्यानंतर महिला हिऱ्यांच्या एक्सपर्टकडे गेली. त्यांनी महिलेला या अंगठीचा लिलाव करण्याचा सल्ला दिला. रिपोर्टनुसार, महिलेच्या अंगठीतील हिरा फार जुनी आणि महागडी आहे. अशात जेव्हा या अंगठीचा लिलाव करण्यात आला तेव्हा यावर अंगठीवर ६ कोटी रूपयांची बोली लावली गेली. वेगवेगळे टॅक्स कापल्यानंतर महिलेला ८५० रूपयांना खरेदी केलेल्या या अंगठीतून ४.५ कोटी रूपये मिळाले.
 

Web Title: Britain woman who bought a ring for 12 dollars 30 years ago finds out its worth a fortune

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.