ठळक मुद्देतिला इंप्रेस करण्यासाठी अनेक प्रयत्न करताना आपण त्यांना पाहीलं आहे.कधी कधी इंटरनेटची तर कधी कधीअनुभवी लोकांची मदत घेतली जाते.एवढी तयारी केली जाते की ती मुलगी होकारच देणार. त्यासाठी अनेक प्रयत्न केले जातात.

चीन - आपल्या प्रेयसीला प्रपोज करण्यासाठी तरुण मंडळी वेगवेगळी शक्कल लढवतात. हटके पद्धतीने आपल्या प्रेयसीला प्रपोज केल्यावर ती खुश होईल आणि आपल्याला होकार देईल असा त्यांचा विश्वास असतो. त्यासाठी गुगलवर सर्च मारा, अनुभवी मंडळीकडून सल्ला घ्या अशा विविध पद्धती अवलंबल्या जातात. पण त्यातूनही त्यांची प्रेयसी राजी होईल याची कोणालाच शाश्वती नसते. चीनमध्ये अशाच एका अवलियाने हटके पद्धतीने आपल्या प्रेयसीला प्रपोज केलंय. तब्बल २५ आयफोन्सच्या हार्ट शेपमध्ये त्याने आपल्या गर्लफ्रेन्डला प्रपोज केलं.

चीनमध्ये राहणारा चिन मिंग या गेम डिझायरने आपल्या प्रेयसीला प्रपोज करण्यासाठी २५ ‘आयफोन एक्स’ खरेदी केले. या आयफोनने त्याने हार्ट शेप तयार केला. त्याखाली फुलांचीही आरास केली. दोघांनाही मोबाईल गेम खेळायला फार आवडतात. दोघेही टेक्नोसेव्ही असल्याने चिन मिंगने प्रपोज करण्यासाठी ही हटके पद्धत वापरली. आपल्या प्रेयसीला जो २५ आयफोन खरेदी करून देऊ शकतो तो आपल्या प्रेयसीच्या सुखासाठी काहीही करू शकतो. त्यामुळे चिनने प्रपोज केल्यावर ‘ली’ या त्याच्या गर्लफ्रेंडनेहही लगेच होकार दिला. २५ आयफोन एक्सने हार्ट शेप आणि फुलांची आरास हे दृष्य फार फिल्मी वाटत असलं तरी एका पठ्ठयाने करून दाखवलं आहे. सध्या सोशल मीडियावर हा फोटो बराच व्हायरल झाला असून आम्हालाही असाच प्रियकर मिळायला हवा अशा प्रतिक्रियाही तरुणींनी व्यक्त केल्यात.

आता तुम्ही म्हणाल २५ आयफोन घेण्याचं कारण काय? तर दोघंही प्रंचंड मोबाईल गेम प्रेमी आहेत. आणि त्याची गर्लफ्रेंड ली हीचं वय २५ आहे. त्यामुळे तिला इम्प्रेस करण्यासाठी या पठ्ठ्याने २५ आयफोन घेण्याचं ठरवलं. यासाठी त्याला २५ लाखांपर्यंतचा खर्च आला असेल. पण तरीही आणखी एक प्रश्न उरतोच, या २५ आयफोनचं ही दोघं करणार तरी काय? यामागचं उत्तर वाचून तुम्हालाही आश्चर्य वाटेल. त्यांच्या या प्रेमात त्यांना मदत करणाऱ्या सगळ्या मित्रांना हे आयफोन देण्यात येणार आहेत. आता तुम्ही म्हणाल की आमचे मित्र, त्यांना गर्लफ्रेंड भेटल्यावर पुन्हा स्वत:चं तोंडही दाखवत नाहीत, मात्र या पठ्ठ्याने तर चक्क आयफोन एक्स गिफ्ट केलंय. असा मित्र प्रत्येकालाच भेटायला हवा.

आणखी वाचा - हट्टी मालकांसमोर हार मानून सरकारने बांधले असे विचित्र रस्ते 

चिन मिंग आणि ली हे दोघंही लवकरच लग्न करणार असून लग्नाची तारीख अजून पक्की झालेली नाही. मात्र एकमेंकाच्या बोटात अंगठी घालून या दोघांनी एकमेंकाना ऐंगेज करून ठेवलंय. जगातील सगळ्यात महागड्या प्रपोजमध्ये या प्रपोजची गणना करायला काहीच हरकत नाही. या आधीही चीनमध्ये एका तरुणाने एका मुलीला प्रपोज करण्यासाठी ९९ ‘आयफोन ६’ खेरदी करून हार्ट शेप तयार केला होता. मात्र त्या इसमाचं दुर्दैव असं की ती मुलगी या सगळ्याने अजिबात इम्प्रेस झाली नाही, त्यामुळे त्याने केलेली मेहनत पूर्णत: वाया गेली होती. 

सौजन्य - techcaption.com


Get Latest Marathi News & Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and local news from all cities of Maharashtra.