ऐकण्याची क्षमता वाढवण्यासाठी कानाची अजब सर्जरी, फोटो झाले व्हायरल! 

By ऑनलाइन लोकमत | Published: March 25, 2019 04:00 PM2019-03-25T16:00:26+5:302019-03-25T16:05:27+5:30

शौक म्हणजेच एखाद्या गोष्टी आवड असणे ही फारच वेगळी गोष्ट असते. कुणाला काय आवड असेल आणि ती पूर्ण करण्यासाठी ती व्यक्ती काय करेल सांगता येत नाही.

Body modification enthusiast has part of ear removed in controversial procedure | ऐकण्याची क्षमता वाढवण्यासाठी कानाची अजब सर्जरी, फोटो झाले व्हायरल! 

ऐकण्याची क्षमता वाढवण्यासाठी कानाची अजब सर्जरी, फोटो झाले व्हायरल! 

Next

(Image Credit : AmarUjala)

शौक म्हणजेच एखाद्या गोष्टी आवड असणे ही फारच वेगळी गोष्ट असते. कुणाला काय आवड असेल आणि ती पूर्ण करण्यासाठी ती व्यक्ती काय करेल सांगता येत नाही. एका ऑस्ट्रेलियन व्यक्तीने असाच त्याचा विचित्र शौक पूर्ण केला. या व्यक्तीने त्याची ऐकण्याची क्षमता वाढवण्यासाठी त्याचे कान कापले. वेगळं दिसण्याच्या नादात लोक आजकाल बॉडी मोडिफिकेशन करत आहेत. असंच या व्यक्तीने दोन्ही कानाचे बाहेरील भाग कापले आहेत. सध्या या व्यक्तीचे फोटो सोशल मीडियात व्हायरल झाले आहेत. 

चार्ल्स बेंटले नावाच्या व्यक्तीने ऐकण्याची क्षमता वाढवण्यासाठी कान कापण्याची इच्छा व्यक्त केली. यासाठी त्याने स्वीडनच्या एका प्रसिद्ध बॉडी मॉडिफिकेशन आर्टीस्ट चाय माइबर्ट (body modification artist Chai Maibert) याला संपर्क केला.

कानाच्या बाहेरील सर्कलला कॉन्क म्हटलं जातं आणि माइबर्ट सांगतो की, या ऑपरेशनला कॉन्क रिमुव्हल म्हणतात. ही एक फार त्रासदायक प्रक्रिया आहे. आणि हे ऑपरेशन जगातले काहीच बॉडी मॉडीफिकेशन आर्टिस्टच करू शकतात. माइबर्टने हे ऑपरेशन त्याच्या स्टॉकहोम येथील स्टुडिओमध्ये केलं.

मोडिफिकेशन आर्टिस्ट माइबर्टने याबाबत इन्स्टाग्रामवर माहिती देत सांगितले की, चार्ल्स वी बेंटलेच्या कामावर मी कॉन्क रिमुव्हल ऑपरेशन केलं आहे. जे ऑस्ट्रेलियाहून माझ्याकडे ऑपरेशन करण्यासाठी आले होते. 

माइबर्टने सांगितले की, या ऑपरेशनमुळे मागून येणारा आवाज ऐकण्याची शक्ती बरीच वाढते. तसेच या ऑपरेशनचा कानावर काहीह दुष्परिणाम होत नाही. पहिले दोन आठवडे तुम्हाला आवाजाची दिशा समजून घ्यायला त्रास होतो. कारण तुमचा मेंदू नव्या

मोडिफिकेशननुसार काम करणार नाही. पण दोन आठवड्यांनी तुमचा मेंदू आणि ऐकण्याच्या क्षमतेचा ताळमेळ बसेल. तुम्ही सहजपणे आवाजाची दिशा ओळखू शकाल. माइबर्टच्या या पोस्टवर ट्विटरवरील लोकांनी फार टीका केली आहे. अनेकांनी यावर सुंदर शरीराला खराब का करावं असंही विचारलं आहे. 

Web Title: Body modification enthusiast has part of ear removed in controversial procedure

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.