कुत्र्यांची दिल-दोस्ती-दुनियादारी; डोळे नसलेल्या एमससाठी टॉबी झाला 'मितवा'!

By ऑनलाइन लोकमत | Published: June 1, 2019 01:39 PM2019-06-01T13:39:30+5:302019-06-01T14:09:49+5:30

कुत्रा आणि माणसाच्या मैत्रीबाबत आपण नेहमीच वाचत-ऐकत असतो. पण दोन कुत्र्यांच्या मैत्रीबाबत फार कमी ऐकायला मिळतं.

Blind Staffie cross has his own guide dog who helps him around | कुत्र्यांची दिल-दोस्ती-दुनियादारी; डोळे नसलेल्या एमससाठी टॉबी झाला 'मितवा'!

कुत्र्यांची दिल-दोस्ती-दुनियादारी; डोळे नसलेल्या एमससाठी टॉबी झाला 'मितवा'!

googlenewsNext

(Image Credit : Sky News)

कुत्रा आणि माणसाच्या मैत्रीबाबत आपण नेहमीच वाचत-ऐकत असतो. दोन कुत्र्यांच्या मैत्रीबाबत फार कमी ऐकायला मिळतं. पण दोन कुत्र्यांच्या मैत्रीची सध्या सोशल मीडियात चांगलीच चर्चा रंगली आहे. हे दोन्ही कुत्रे ब्रिटनमधील आहेत. 

स्टेफी एमस हा कुत्रा सगळ्यांचं लक्ष वेधून घेत आहे. स्टेफी बघू शकत नाही. त्यामुळे त्याच्या मदतीसाठी त्याच्यासोबत गाइड म्हणून एक टॉबी नावाचा कुत्रा सतत असतो. टॉबी स्टेफीला रस्ता दाखवतो आणि त्याच्याशी गप्पाही मारतो. दोघांमध्ये सुंदर बॉंडींग आहे आणि खऱ्या मित्रांप्रमाणे ते सतत सोबत राहतात. इतकेच नाही तर टॉबी स्टेफीला जेवण करण्याचा कटोरा शोधण्यासही मदत करतो.

या दोन्ही कुत्र्यांची मालक २७ वर्षी जेस मार्टिन आहे. ती एका फायर सर्व्हिस कंपनीमध्ये काम करते. जेस सांगते की, स्टेफी एमस जन्मापासूनच बघू शकत नाही. त्याचा जन्म एका बचाव केंद्रात झाला होता. साधारण ४ महिने त्याच्यावर उपचार सुरू होते. गेल्या वर्षी ऑगस्ट महिन्यात जेसने स्टेफीला पहिल्यांदा पाहिलं होतं. त्यावेळी स्टेफी केवळ ९ दिवसांचा होता. नंतर जेस त्याला घरी घेऊन आली.

जेसनुसार, मोठा प्रश्न होता की, घरी आणल्यानंतर एमस कशाप्रकारे आपलं जीवन जगू शकेल? पण काही दिवसांनी त्याला एका दुसऱ्या कुत्र्यासोबत ठेवलं गेलं. सुरूवातील दोघांमध्ये खास बॉंडींग नव्हतं. कारण एमसला जनावरांचे नियम माहीत नव्हते. त्यामुळे टॉबी एमसकडे सतत दुर्लक्ष करत होता.

कालांतराने दोघांची चांगली मैत्री झाली आणि टॉबी एमसचा गाइड झाला. टॉबी प्रत्येक गोष्टीत त्याची मदत करण्याचा प्रयत्न करत असतो. जेस सांगते की, आम्ही एमसला वॉकला घेऊन जातो तेव्हा तो आवाजाने घाबरतो. यावेळी टॉबी त्याची मदत करतो.

Web Title: Blind Staffie cross has his own guide dog who helps him around

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.