ठळक मुद्देसौंदर्य आपली कमजोरी न बनता आपली ताकद बनायला हवी.मात्र या डॉलला आपल्या सौंदर्याचा इतका त्रास होतोय की तिला बाहेर फिरणंही कठीण होऊन बसलंय.एकटीनं बाहेर फिरणं किंवा कामाव्यतिरिक्त बाहेर जाणं तिला जवळपास बंद करावं लागलंय.

रशिया - नखशिखांत सुंदर दिसण्याकरता तरुणी किती प्रयत्न करतात. डाएटपासून ते कॉस्मेटिक्सपर्यंत सारं काही त्यांचं ठरलेलंच असतं. एखाद्या नियमित  व्यायामाप्रमाणे ते स्वत:च्या चेहऱ्याची आणि शरीराची काळजी घेतात. एखाद्या बाहुलीप्रमाणे आपण हुबेहूब दिसावं असं प्रत्येकालाच वाटतं. पण तुम्हालाही असं वाटत असेल तर सावधान, कारण अतिसुंदर दिसणं आपल्यासाठी थोडं-फार घातकही असू शकतो.

रशियात राहणाऱ्या २६ वर्षीय अँजेलिका केनोव्हा ही ह्युमन बार्बी अशाच परिस्थितीचा सामना करतेय. मध्यंतरी तिचे फोटो सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाले होते. हुबेहूब बार्बीप्रमाणे तिच्या शरीराची ठेवण असल्याने प्रत्येकीला आपण असंच दिसलं पाहिजे असं वाटत होतं. फेसबूक, इन्स्टाग्रामवर तिच्या फोटोंनी धुमाकूळ घातला होता. मात्र आता तिला तिच्या या सौंदर्याचाच त्रास होऊ लागलाय. अँजेलिका पेशाने मॉडेल असल्याने तिला सतत घराबाहेर राहावं लागतं. मात्र कामाव्यतिरिक्त ती घराबाहेर पडूच शकत नाही. तिची एक झलक पाहण्यासाठी घराबाहेर हजारो लोकांच्या रांगा लागलेल्या असतात.

तिला नुसतं पाहता यावं याकरता कित्येकजण दिवसभर घरासमोरच उभे असतात. त्यांच्या गराड्यातून बाहेर काढण्यासाठी तिला कडेकोट बंदोबस्त केला जातो. इतरांचा त्रास होऊ नये याकरता तिची घरची मंडळी बरीच मेहनत घेतात. तिला कोणती वस्तू हवी असल्यास तिची आई बाजारातून आणून देते. त्यामुळे कामाव्यतिरिक्त अँजेलिका घराबाहेर फिरताना तुम्हाला केव्हाच दिसणार नाही.

सर्व फोटो - https://goo.gl/ZA6jTJ

या अशा बंदिस्त जीवनामुळे तीही थोडीशी नाराज झाली आहे. प्रत्येकवेळी घराच्या बाहेर पडताना सुरक्षारक्षकांच्या कडेकोट बंदोबस्तातच बाहेर पडावं लागल्याने तिचं स्वातंत्र्य हरवलंय की काय अशाच प्रतिक्रिया सध्या समोर येताएत. बार्बीसारखं दिसावं असं प्रत्येकीलाच वाटतं. काही तरुणी अगदी हुबेहूब बार्बीसारख्या दिसतातही. मात्र  वरवर आपल्याला वाटतं तितकं त्यांचं आयुष्य सोपं नसतं.

गर्दीच्या गराड्यातून स्वत:ची सुटका करून घेत त्यांना प्रत्येक ठिकाण गाठावं लागतं. म्हणूनच अतिसुंदर दिसण्या करता तुम्ही प्रयत्न करत असाल तर थोडंसं सबुरीनं घ्या. कारण ते तुमच्याच अंगलट येण्याची शक्यता आहे. 

सौजन्य - www.wittyfeed.com