ऑनलाइन लोकमत
धर्मशाळा, दि. 20 - रजिया सुल्तान या मालिकेतून प्रेक्षकांच्या पसंतीस उतरलेल्या पंखुरीनं एका व्यक्तीचा कानशिलात लगावली आहे. त्या व्यक्तीनं पंखुरीला चुकीच्या भावनेनं स्पर्श करण्याचा प्रयत्न केला. पंखुरी अवस्थीलाही शोषण करणा-या व्यक्तीला योग्य धडा शिकवल्याचा गर्व आहे.

पंखुरी म्हणाली, यापूर्वी माझ्यात याविरोधात उभे राहण्याची हिंमत नव्हती, मात्र मी आता शोषणाविरोधात उभी राहते. बंगळुरूत मित्रांसोबत होती. मी स्कर्ट परिधान केला होता. त्याच वेळी एक व्यक्ती माझ्याजवळ आला आणि त्यानं माझ्या मांड्यांना स्पर्श करण्याचा प्रयत्न केला. त्याच क्षणी मला राग अनावर झाला नि मी त्याच्या कानशिलात भडकावली.

पंखुरी लवकरच 'क्या कुसूर है अमला का ?' या हिंदी मालिकेच्या माध्यमातून पुन्हा एकदा प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. ही मालिका तुर्की मालिका फातमागुलचं हिंदी रुपांतर आहे. क्या कुसूर है अमला का ? ही मालिका एका तरुणीच्या आयुष्यात येणा-या चढ-उतारांवर आधारित आहे. या मालिकेत काम करण्यास मिळाल्यानं मी गर्व अनुभव करते. मी आनंदी आहे की क्या कुसूर है अमला का ? या मालिकेत मला महत्त्वाची भूमिका मिळणार आहे, असंही पंखुरी म्हणाली आहे. या मालिकेत पंखुरीसोबतच राजवीर सिंह, अनंत जोशी, राजेश खट्टर, अक्षय आनंद आणि कस्तूरी बॅनर्जी यांची प्रमुख भूमिका असणार आहे.

क्या कुसूर है अमला का ? ही मालिका 3 एप्रिल 2017पासून प्रसारित होणार आहे. पंखुरीनं क्या कसूर है अमला का? च्या सेटवर दिलखुलास वक्तव्यं केली आहे. ती म्हणाली, भारतात मुंबई हे एक सुरक्षित शहर आहे. दिल्ली, बंगळुरू, चंडिगढ आणि नोएडामध्ये मी राहिली असून, इतरही काही शहरांमध्ये मी वास्तव्य केलं आहे. हे सर्व शहर महिलांसाठी सुरक्षित आहेत, असं मी म्हणणार नाही. दिल्लीत वास्तव्याला असताना मेट्रोनं कॉलेजला जात होती. त्यावेळी अशा अनेक घटना अाजूबाजूला घडत होत्या. मात्र त्यावेळी ते प्रकार समजण्याच्या पलिकडचे होते. शहरं ही रात्री मुलींसाठी सुरक्षित नसतात. तसेच न घाबरता या शहरांत रात्रीचं बाहेर पडण्याचा विचारही करू शकत नाही. पंखुरी अवस्थीनं 2 मार्च 2015ला रजिया सुल्तान या मालिकेत काम केलं होतं. या मालिकेत तिने नकारात्मक भूमिका साकारली होती. ही मालिका अँड टीव्हीवर सोमवार ते शुक्रवार रात्री 7.30 वाजता प्रसारित होत होती.