त्यानं भावी पत्नीला whatsapp वर मजेत म्हटलं 'मूर्ख' अन् असं घडलं...

By ऑनलाइन लोकमत | Published: December 12, 2018 05:23 PM2018-12-12T17:23:41+5:302018-12-12T17:28:43+5:30

अबु धाबीमध्ये एका तरुणाला मजेत केलेला व्हॉट्सअॅपवरील मेसेज चांगलाच महागात पडला आहे. या तरुणांने आपल्या भावी पत्नीला व्हॉट्सअॅपवर एक मेसेज पाठविला आणि त्याची रवानगी थेट तुरुंगात झाली आहे.

abu dhabi man fined 20000 dirhams and 60 days in jail for calling fiancee idiot in whatsapp | त्यानं भावी पत्नीला whatsapp वर मजेत म्हटलं 'मूर्ख' अन् असं घडलं...

त्यानं भावी पत्नीला whatsapp वर मजेत म्हटलं 'मूर्ख' अन् असं घडलं...

googlenewsNext

दुबई : अबु धाबीमध्ये एका तरुणाला मजेत केलेला व्हॉट्सअॅपवरील मेसेज चांगलाच महागात पडला आहे. या तरुणांने आपल्या भावी पत्नीला व्हॉट्सअॅपवर एक मेसेज पाठविला आणि त्याची रवानगी थेट तुरुंगात झाली आहे.

Khaleej Times च्या वृत्तानुसार, एका तरुणाने आपल्या होणाऱ्या पत्नीला व्हॉट्सअॅपवर मेसेज पाठविला. या मेसेजमध्ये त्याने तिला मजेत  'हबला' (मराठीत मूर्ख तर हिंदीमध्ये बेवकूफ) असे म्हटले. मात्र, तिला हा शब्द अपमानजनक वाटला. त्यामुळे तिने थेट पोलीस स्टेशन गाठले आणि या तरुणाविरोधात तक्रार दाखल केली.

या प्रकरणी संबंधित तरुणाला 60 दिवसांचा तुरुंगवास आणि जवळपास 4 लाख रुपयांचा दंड ठोठावण्यात आला आहे. दरम्यान, अशा प्रकारची घटना गेल्या जानेवारी महिन्यात घडली होती. त्यावेळी एका ब्रिटिश नागरिकाने दुबईतील कार डीलरला रागाने इमोजी पाठविली होती. तेव्हा त्या ब्रिटिश नागरिकाला तुरुंगात पाठविले होते.

कायदेशीर सल्लागार हसन-अल-रियामी यांनी येथील स्थानिक न्यूज पेपर Emarat Al Youm ला दिलेल्या माहितीनुसार, सोशल मिडीयावर कोणताही व्यक्तीने अपमानजनक शब्दाचा वापर केल्यास, त्या व्यक्तीवर सायबर क्राईमचा गुन्हा दाखल करण्यात येतो.  
 

Web Title: abu dhabi man fined 20000 dirhams and 60 days in jail for calling fiancee idiot in whatsapp

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.