जलाशयातील पाणी आटलं अन् जे समोर आलं ते पाहून अवाक् झाले संशोधक!

By ऑनलाइन लोकमत | Published: July 1, 2019 01:11 PM2019-07-01T13:11:31+5:302019-07-01T13:18:11+5:30

एका जलाशयातील पाण्याची पातळी खाली गेली आणि ३४०० वर्ष जुनं एक हैराण करणारं सत्य समोर आलं. जे समोर आलं ते पाहून तर वैज्ञानिकही अवाक् झाले.

3400 year old palace from a mysterious civilization revealed due to lack of water level | जलाशयातील पाणी आटलं अन् जे समोर आलं ते पाहून अवाक् झाले संशोधक!

जलाशयातील पाणी आटलं अन् जे समोर आलं ते पाहून अवाक् झाले संशोधक!

Next

अनेकदा नकळतही असं काही सापडतं जे अनेक वर्ष शोध घेऊनही सापडत नसतं. असाच एक शोध इराकच्या कुर्दिस्तानमध्ये लागला आहे. इथे एका जलाशयातील पाण्याची पातळी खाली गेली आणि ३४०० वर्ष जुनं एक हैराण करणारं सत्य समोर आलं. जे समोर आलं ते पाहून तर वैज्ञानिकही अवाक् झाले.

हा शोध टिगरिस नदीच्या तटावरील मोसुल बांधातील पाणी कमी झाल्याने लागला. या शोधाचं श्रेय कुर्दिश-जर्मन संशोधकांना जातं. पुरातत्व अभ्यासकांना पहिल्यांदाच २०१० मध्ये या ठिकाणाबाबत माहिती मिळाली होती. त्यावेळी जलाशयात पाणी कमी होती. पण खोदकाम करता येत नव्हतं.

(Image Credit : International News)

या जलाशयातील पाणी कमी झालं आणि ३४०० वर्ष जुन्या एका महालाचे अवशेष समोर आलेत. मीडिया रिपोर्ट्सनुसार, हा महाल मित्तानी साम्राज्यातील आहे.

अभ्यासक इवाना पुलित्स यांनी सांगितले की, महालाची इमारत फारच सुंदरतेने डिझाइन करण्यात आली होती. या महालाला २ मीटर जाड मातीच्या भींती आहेत. तर काही भींती यापेक्षाही जाड आहे. तर वेगवेगळ्या खोल्यांमध्ये प्लास्टर केलेल्या भींती आहेत.

खोदकामावेळी महलातून लाल आणि निळ्या रंगाच्या पेंटिंगही मिळाल्या. असे सांगितले जाते की, पेंटिंग प्राचीन काळातील महलांची विशेषता होती. असा अंदाज लावला जात आहे की, हा महाल मूळ रूपात ६४ फूट उंच होता.

३४०० वर्ष जुन्या या महालात १० छोटे छोटे दगडही मिळालेत. ज्यांवर काही लिहिलेलं आहे. या दगडांना  क्युनिफॉर्म टॅबलेट म्हटलं जातं. क्युनिफॉर्म ही लिहिण्याची प्राचनी शैली होती. आता या दगडांवर काय लिहिलं गेलं आहे, याचा अभ्यास सुरू आहे.

अभ्यासकांचं म्हणनं आहे की, मित्तानी साम्राज्याबाबत फार कमी शोध झालेत. पण या शोधानंतर आता त्यांच्या साम्राज्याबाबत खूप माहिती समोर येईल. सध्या या महालाचं खोदकाम सुरू आहे.

Web Title: 3400 year old palace from a mysterious civilization revealed due to lack of water level

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.