जामनेर तालुक्यातील मोहाडी येथील इसमाने खानापूर शिवारात निंबाच्या झाडावर घेतला तरुणाचा गळफास

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 22, 2019 10:01 PM2019-04-22T22:01:55+5:302019-04-22T22:03:21+5:30

रावेर तालुक्यातील खानापूर शिवारातील जुन्या चोरवड शिवार रस्त्यालगत निंबाच्या झाडाला गळफास घेऊन विजय मधुकर बागुल (वय ४२, रा.मोहाडी, ता.जामनेर) यांनी गळफास घेऊन आत्महत्या केली. ही घटना सोमवारी सकाळी सात वाजता उघडकीस आली.

A youth was taken to a Nimbus tree in Shahapur, Mohali, Jamner Taluka of Jamnar taluka. | जामनेर तालुक्यातील मोहाडी येथील इसमाने खानापूर शिवारात निंबाच्या झाडावर घेतला तरुणाचा गळफास

जामनेर तालुक्यातील मोहाडी येथील इसमाने खानापूर शिवारात निंबाच्या झाडावर घेतला तरुणाचा गळफास

googlenewsNext
ठळक मुद्दे खानापूर शिवारातील घटना डॉक्टरांनी मेडिकल स्टोअर्सच्या पॅडवर दिलेल्या प्रिस्क्रीप्शनवरून पटली ओळख

रावेर, जि.जळगाव : तालुक्यातील खानापूर शिवारातील जुन्या चोरवड शिवार रस्त्यालगत निंबाच्या झाडाला गळफास घेऊन विजय मधुकर बागुल (वय ४२, रा.मोहाडी, ता.जामनेर) यांनी गळफास घेऊन आत्महत्या केली. ही घटना सोमवारी सकाळी सात वाजता उघडकीस आली.
बोंडे मळपट्टीतील माजी सरपंच गोवर्धन बोंडे यांच्या केळीबागेच्या बांधावरील पडविहिरीलगतच्या निंबाच्या झाडावर खंडित वीज संयोजनाच्या लटकलेल्या जुन्या टणक ताराला गळफास घेतलेल्या स्थितीत त्यांचा मृतदेह आढळला.
प्रगत शेतकरी गोवर्धन बोंडे यांचे दिवाणजी ओंकार गोविंदा धांडे यांना हा प्रकार सकाळी उघडकीस आला. त्यामुळे त्यांनी रावेर पोलिसांना ही माहिती दिली. दरम्यान, पो.हे.कॉ. बिजू जावरे व पो.कॉ. नीलेश चौधरी यांनी मयताचा घटनास्थळी पंचनामा केला. मयताच्या खिशात एका डॉक्टरने दिलेल्या औषधीच्या प्रिस्क्रीप्शनवर रोटवद, ता.जामनेर येथील राम मेडिकल स्टोअसचा दूरध्वनी क्रमांक आढळून आल्याने मयताची ओळख पटण्यास मदत झाली.
संबंधित डॉक्टर व मेडिकल स्टोअर्सच्या समन्वयातून या मयताची ओळख पटली. जामनेर येथील जीएम फाऊंडेशनमधील आरोग्य सेवेत सेवारत असलेले रोटवद येथील उमेश बागूल यांचे ते थोरले बंधू होत. दोन वर्षांपूर्वी मयताच्या पत्नीचे अकाली निधन झाल्याने व तद्नंतर एका भीषण अपघातात गंभीर जखमी झालेल्या मयताच्या मेंदूवर मोठी शस्त्रक्रिया झाल्यापासून काहींशी मानसिक स्वास्थ्य बिघडल्याने हा प्रकार घडला असावा, असा अंदाज वर्तविण्यात येत आहे.
रावेर ग्रामीण रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक डॉ.बी.बी.बारेला यांनी शवविच्छेदन केले. पुढील तपास पोलीस निरीक्षक रामदास वाकोडे यांच्या मार्गदर्शनाखाली पोहेकॉ बिजू जावरे व पोकॉ नीलेश चौधरी तपास करीत आहेत. मयताच्या पश्चात पाच ते सहा वर्षांचा मुलगा असल्याने एकच हळहळ व्यक्त होत आहे.
विवरे बुद्रूक मतदान केंद्रावरील बंदोबस्तावरून मयताचे चुलत भाऊ आले धावून
मोहाडी येथील मयताचे सख्खे चुलतभाऊ असलेले पोकॉ हितेश बागूल यांची तालुक्यातील विवरे बुद्रूक येथील मतदान केंद्रावर बंदोबस्तात तैनात असलेले पो.कॉ. हितेश बागूल यांच्याकडे मयताचा गळफास घेऊन आत्महत्या केली. यासंबंधीचा फोटो व्हॉटस्अ‍ॅपवरून व्हायरल झाल्याने त्यांना धक्काच बसला होता. सदर मयताचा फोटो व रावेर ग्रामीण रुग्णालयातील शवविच्छेदन गृहात त्यांनी प्रत्यक्ष मृतदेह पाहून त्यांना मृतदेहाची ओळख पटली.
एवढ्या जामनेरच्या लांब अंतरावरून रावेर तालुक्यातील खानापूर शिवारात हा कसा काय पोहचला? असाच अनुत्तरीत प्रश्न त्यांच्या आप्तेष्टांमधून व्यक्त होत होता. जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांचे ‘जी एम फाऊंडेशन’ या आरोग्य सेवेत वाहून घेतलेल्या उमेश बागूल यांचे ते थोरले बंधू आहेत. भीषण अपघातात गंभीर दुखापत झाल्याने मेंदूवर मोठी यशस्वी शस्त्रक्रिया झाल्यानंतरही ५ ते ६ वर्षांचा कोवळा मुलगा मातृछत्रापाठोपाठ आता पितृछत्रही हरवल्याने हळहळ व्यक्त होत आहे.

Web Title: A youth was taken to a Nimbus tree in Shahapur, Mohali, Jamner Taluka of Jamnar taluka.

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.