रावेर येथे महसूल कर्मचाºयांचे लेखणी बंद आंदोलन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 19, 2018 05:03 PM2018-01-19T17:03:00+5:302018-01-19T17:06:55+5:30

अमळनेर तालुक्यातील पिंगलवाडे येथील तलाठ्याला मारहाणीचा केला निषेध

Writing off the writings of revenue workers at Raver | रावेर येथे महसूल कर्मचाºयांचे लेखणी बंद आंदोलन

रावेर येथे महसूल कर्मचाºयांचे लेखणी बंद आंदोलन

Next
ठळक मुद्देतहसील कार्यालयात काळ्या फिती लावून निदर्शनेमहसूल कर्मचाºयांनी निषेध नोंदवित ठेवली लेखणी बंददोषींविरूद्ध तत्काळ कारवाई करण्याची केली मागणी

आॅनलाईन लोकमत
रावेर, दि.१९ : अमळनेर तालुक्यातील पिंगलवाडे येथील तलाठी योगेश पाटील यांना अवैध गौणखनिज वाहतूक करणाºया वाहनचालक व मालकांनी मारहाण व जीवघेणा हल्ला केल्याच्या निषेधार्थ येथील तहसील कार्यालयात तलाठीसंघ व महसूल कर्मचारी संघटनेने काळ्या फिती लावून निषेध नोंदवत लेखणी बंद आंदोलन केले.
तहसीलदार विजयकुमार ढगे यांना शुक्रवारी निवेदन सादर करून संबंधित दोषींना तातडीने अटक करून कठोर कारवाई करावी अन्यथा आंदोलन कायम ठेवण्याचा इशारा दिला. महसूल कर्मचारी संघटनेचे सकावत तडवी, प्रगती कोल्हे, संगीता घोंगडे, शिवकुमार लोलपे, शेखर तडवी, अमोल घाटे, संजय राठोड, ए. यू. घाटे, मंडळाधिकारी एन. जे. खारे, तलाठी पी. आर. वानखेडे, डी. बी. पवार, वाय. आय.तडवी, ए. एम. खवले, जी. सी. बारेला, वाय. एच. न्हाळदे, के. के. कदम, तलाठी गवई, ए. एम. खवले, आर. एस. जोरवार, डी. व्ही. कांबळे, एच. व्ही. वाघ, प्रवीण पाटील, वसावे आदींनी तहसील कार्यालयाच्या आवारात काळ्या फिती लावून निदर्शने केली.

Web Title: Writing off the writings of revenue workers at Raver

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.