ठळक मुद्देरब्बीचा हंगाम कसा येणार ?जिल्ह्यातील पश्चिम भागात भीषण परिस्थिती36 गावांमध्ये 18 टँकर

ऑनलाईन लोकमत


जळगाव, दि. 13 - जिल्ह्यात गेल्या पंधरा दिवसांपासून पावसाने दडी मारल्याने पावसाअभावी सर्वाच्या चिंता वाढल्या आहे. सोबतच जिल्ह्यातील तीन मोठे धरण वगळता इतर जलसाठय़ात पुरेसे पाणी नसल्याने रब्बी हंगाम धोक्यात येण्याच्या चिंतेने बळीराजा हवालदिल झाला आहे.  गेल्या वर्षी परतीच्या पावसामुळे धरणसाठय़ात मोठी वाढ झाली होती. यामुळे पावसाची तूट भरून निघण्यासाठी सर्व मदार आता परतीच्या पावसावर आहे.
जिल्ह्यात भरपावसाळ्य़ाच्या महिन्यात 36 गावांना 18 टँकरने पाणीपुरवठा केला जात आहे. यामध्ये सर्वाधिक अमळनेर तालुक्यात 23 गावांना 10 टँकरने तर जामनेर तालुक्यात सात गावांना 4 टँकर, बोदवड, पारोळा तालुक्यात प्रत्येकी दोन गावांना एक-एक टँकर तसेच जळगाव व भुसावळ तालुक्यात प्रत्येकी एका गावाला एक-एक टँकरने पाणीपुरवठा केला जात आहे. 
94 गावांमध्ये 93 विहिरींचे अधिग्रहण
टँकरने पाणीपुरवठय़ासह जिल्ह्यात 94 गावांमध्ये 93 विहिरींचे अधिग्रहण करण्यात आले आहे. यामध्ये सर्वाधिक अमळनेर तालुक्यात 35 गावांमध्ये 35 विहिरींचे अधिग्रहन करण्यात आले आहे. या सोबतच जिल्ह्यातील 10 गावांमध्ये 8 ठिकाणी तात्पुरती पाणीपुरवठा योजना राबविली जात आहे.
 
अनेक प्रकल्पांमध्ये शून्य टक्के जलसाठा
जिल्ह्यातील अनेक मध्यम प्रकल्पांमध्ये जलसाठा नसल्याने प्रशासनाची चिंता वाढणार आहे. अगAावती, हिवरा, बहुळा, भोकरबारी, बोरी, मन्याड या प्रकल्पांमध्ये शून्य टक्के जलसाठा आहे. तर अंजनी प्रकल्पात  4 टक्के जलसाठा आहे. मात्र  हतनूर, वाघूर व गिरणा या मोठय़ा प्रकल्पांमध्ये  समाधानकारक जलसाठा असल्याने तेवढीच एक समाधानाची बाब शेतक:यांसाठी आहे.   

जिल्ह्यातील पश्चिम भागाकडील अमळनेर, भडगाव व पाचोरा या तालुक्यांमध्ये पावसाअभावी भीषण परिस्थिती निर्माण झाली आहे. यात अमळनेर व भडगाव तालुक्यात वार्षिक सरासरीच्या तुलनेत 50 टक्क्याहून कमी पाऊस झाला आहे. हीच परिस्थिती पूर्वेकडील मुक्ताईनगर व बोदवड तालुक्यातदेखील आहे.  सर्वात कमी 43.1 टक्के पाऊस मुक्ताईनगर तालुक्यात झाला आहे.  परतीच्या पावसाची वेळ आली तरी जिल्ह्यात अद्याप सरासरीच्या 61 टक्के पाऊस झाला आहे. 

एक तर पाऊस कमी व त्यात जलसाठय़ांचीही बिकट स्थिती, यामुळे रब्बी हंगामाला पाणी कसे उपलब्ध करावे, या चिंतेत बळीराजा आहे. आता सर्व आशा या महिन्यातील परतीच्या पावसाकडून असल्याचे बळीराजाचे म्हणणे आहे.