सन्मानाने भारावल्या महिला, विविध क्षेत्रातील महिलांचा गौरव
सन्मानाने भारावल्या महिला, विविध क्षेत्रातील महिलांचा गौरव

आॅनलाइन लोकमत
जळगाव, दि. ८ - जागतिक महिला दिनाच्या पूर्वसंध्येला रोटरी ईस्ट व युवाशक्ती फाउंडेशन यांच्यावतीने बुधवारी संध्याकाळी विविध क्षेत्रात आपल्या कतृत्वाने ठसा उमटविणाºया ११ महिला, तरुणींचा सत्कार करण्यात आला. या सत्काराने महिला भारावून गेल्या.
या वेळी कांताई नेत्रालयाच्या संचालिका डॉ. भावना जैन, संगीता निंबाळकर, रोटरी ईस्टचे अध्यक्ष डॉ. गोविंद मंत्री, सचिव मनीष पात्रीकर, ज्येष्ठ पत्रकार दिलीप तिवारी उपस्थित होते. उपस्थितांनी मार्गदर्शन करून महिलांच्या कर्तृत्वाला सलाम केला. या वेळी शिक्षण, आरोग्य, परिवहन, स्वच्छता इत्यादी क्षेत्रातील महिलांचा सन्मान करण्यात आला.
या महिलांचा झाला सत्कार (कंसात क्षेत्र)
डॉ. श्रद्धा चांडक (वैद्यकीय), रेवती ठिपसे (कॅन्सर सपोर्ट ग्रुप), याजवीन पेसुना (शिक्षण), तिलोत्तमा जाधव (बस वाहक), कुमुदिनी नारखेडे (सांस्कृतिक), शीला कसबे (मनपा), कविता विसपुते (पोलीस), जावळे ( आरोग्य), शुभदा नेवे, मुनीरा टरवारी (माध्यम), मनिषा बागूल (अंकूर फाउंडेशन).
युवाशक्ती फाउंडेशनचे अध्यक्ष विराज कावडिया, मंजीत जांगीड, पियूष हसवाल, शिवम महाजन, विनोद सैनी, अमीत जगताप, तेजस श्रीश्रीमाळ यांनी परिश्रम घेतले.


Web Title: Women who are honored
Get Latest Marathi News & Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and local news from all cities of Maharashtra.