चाळीसगाव तालुक्यात बिबट्याच्या हल्ल्यात महिला ठार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 15, 2017 07:00 PM2017-11-15T19:00:03+5:302017-11-15T19:05:16+5:30

चाळीसगाव तालुक्यातील दरेगाव रस्त्यालगतच्या शेतात घडली घटना

Women killed in leopard attack in Chalisgaon taluka | चाळीसगाव तालुक्यात बिबट्याच्या हल्ल्यात महिला ठार

चाळीसगाव तालुक्यात बिबट्याच्या हल्ल्यात महिला ठार

Next
ठळक मुद्देशेतात काम करणाºया मजुरांमध्ये भीतीगंभीर जखमी झाल्याने मृत्यूकापूस वेचणी करीत असताना केला हल्ला

आॅनलाईन लोकमत
चाळीसगाव दि.१५ : बिबट्याने शेतात कपाशी वेचणाºया दीपाली नारायण जगताप (वय २५) या महिलेवर हल्ला केला. यात ही महिला जागीच ठार झाली. ही घटना बुधवारी दुपारी चार वाजता वरखेडे गावापासून एक कि.मी. अंतरावर दरेगाव रस्त्यालगतच्या शेतात घडली.
या महिलेचे घर शेतातच आहे. बुधवारी दुपारी कपाशी वेचणी करीत असतांना बिबट्याने तिच्यावर हल्ला केला. गंभीर जखमी झाल्याने त्या मयत झाल्या. गेल्या आठ दिवसापासून सायगाव, उंबरखेडे, वरखेडे, पिलखोड परिसरात सातत्याने बिबट्याचे दर्शन होत आहे. सोमवारी देखील मेंढपाळांना तो याच परिसरात दिसला होता.
यापूर्वी देखील बिबट्याच्या हल्ल्यात उंबरखेडे येथील एक महिला व अकरा वर्षीय मुलगा ठार झाला आहे. सायगाव येथील शेतात काम करणा-या दोन महिलाही बिबट्याच्या हल्ल्यात गंभीर जखमी झाली आहेत.

Web Title: Women killed in leopard attack in Chalisgaon taluka

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.