कुटुंब घरात झोपलेले असताना जळगावात चोरट्यांनी लांबविला लाखोचा ऐवज

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 24, 2019 08:43 PM2019-06-24T20:43:35+5:302019-06-24T20:47:05+5:30

कुटुंबिय घरातील हॉलमध्ये झोपलेले असताना आतून बंद असलेल्या बेडरुमचा दरवाजा उघडून चोरट्यांनी युवराज अशोक नेहेते (४०, रा. देविदास नगर, जुना खेडी रोड) यांच्या कपाटातील ४० हजार रुपये रोख व दागिने असा एकूण १ लाख ३ हजार ८०० रुपयांचा ऐवज लांबविल्याची घटना सोमवारी सकाळी साडे चार वाजेच्या सुमारास जुना खेडी रोड परिसरात उघडकीस आली. 

When the family is asleep in the house, the thieves in Jalgaon are worth lakhs of rupees | कुटुंब घरात झोपलेले असताना जळगावात चोरट्यांनी लांबविला लाखोचा ऐवज

कुटुंब घरात झोपलेले असताना जळगावात चोरट्यांनी लांबविला लाखोचा ऐवज

googlenewsNext
ठळक मुद्दे  जुना खेडी रस्त्यावर चोरी  खिडकीतून हात टाकून उघडला दरवाजा शहरात चो-यांचे सत्र सुरुच

जळगाव : कुटुंबिय घरातील हॉलमध्ये झोपलेले असताना आतून बंद असलेल्या बेडरुमचा दरवाजा उघडून चोरट्यांनी युवराज अशोक नेहेते (४०, रा.देविदास नगर, जुना खेडी रोड) यांच्या कपाटातील ४० हजार रुपये रोख व दागिने असा एकूण १ लाख ३ हजार ८०० रुपयांचा ऐवज लांबविल्याची घटना सोमवारी सकाळी साडे चार वाजेच्या सुमारास जुना खेडी रोड परिसरात उघडकीस आली. 
दरम्यान, चोरट्यांनी अलगदपणे खिडकीतून हात टाकून दरवाजाचा कडी उघडून चोरी केली आणि परत जाताना बाहेरुन कडी लावून घेतली होती. याप्रकरणी शनी पेठ पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल झाला आहे. गेल्या आठवड्यापासून शहरात रोज चो-या व घरफोड्या होत असून चोरट्यांनी पोलिसांना आव्हान दिले आहे.
शहरातील जुना खेडी रोड परिसरातील देविदास नगरात युवराज अशोक नेहते हे पत्नी व दोन मुलांसह वास्तव्यास आहेत. एमआयडीसी परिसरातील पॉलीमर कंपनीत मजूर म्हणून कामाला असून त्यावर त्यांचा उदरनिर्वाह भागवितात. रविवारी रात्री जेवणानंतर नेहते कुटुंबिय १०.३० वाजता हॉलमध्ये झोपले होते. घराचा मुख्य दरवाजा तसेच बेडरुमच्या मागील बाजूच्या दरवाजाला आतून कडी लावली होती.
बाहेरुन कडी लावून पोबारा
चोरट्यांनी बेडरुमच्या मागील बाजूच्या खिडकीतून हात टाकून आतून बंद असलेला दरवाजा उघडला. कुठलाही आवाज न करता कपाटाचे कुलूप तोडले व त्यातील दीड तोळ्याची ३० हजार रुपयांची सोन्याची पोत, दहा ग्रॅमचे कानातले २५ हजार रुपयांचे तीन कर्णफुले, १ ग्रॅमचे ८ हजार रुपयांचे मंगळसूत्र, २ ग्रॅमचा नेकलेस, २०  ग्रॅमचे पैंजण असे ८००  रुपयांचे चांदीचे दागिने व ४० हजार रुपये रोख असा एकूण १ लाख ३ हजार रुपये ८०० रुपयांचा ऐवज लांबविला. पहाटे चार वाजता नेहते यांच्या पत्नी उठल्या असता त्यांना बेडरुममध्ये सामान अस्ताव्यस्त तर खोलीला बाहेरुन कडी लावलेली असल्याचे दिसून आले. 

Web Title: When the family is asleep in the house, the thieves in Jalgaon are worth lakhs of rupees

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.